अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीमागचं गुपित काय?

साखर संकुलातील बैठक झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त बैठक देखील पार पडली. काका-पुतण्याच्या या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीमागचं गुपित काय?

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अधिकारी देखील उपस्थित होते. साखर संकुलातील बैठक झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त बैठक देखील पार पडली. काका-पुतण्याच्या या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सर्वप्रथम, कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा कशापद्धतीने वापर करावा? यासंदर्भात सोमवारी सकाळी चर्चा करण्यात आली होती. या चर्चेनंतर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काही अधिकाऱ्यांसोबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंदर्भात चर्चा झाली. मात्र, या चर्चेनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात महत्वाची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांसोबत बैठक किंवा कार्यक्रम करण्यास टाळत होते. पण अचानक काका-पुतणा यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यासोबतच, काका-पुतणा यांच्या भेटीमागचं नेमकं गुपित काय? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

हेही वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंक ई- रिक्षा वितरणाचा कार्यक्रम
 

काका-पुतण्याची युती होणार?

मागील काही काळापासून उपमुख्यमंत्री अजित पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत येण्यास टाळत होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील बैठकीत उपस्थित होते आणि या बैठकीत त्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर, रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून शरद पवार साताऱ्यात उपस्थित होते. मात्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकत्र उपस्थित राहिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वेगळी बैठक सुरू आहे. त्यासोबतच, गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणात म्हणाले की, 'काकांचा आशीर्वाद घ्यावा लागतो', असे त्यांनी वक्तव्य केले होते. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सर्वत्र होत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांची युती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number