संत साहित्याचा व्यासंगी अभ्यासक हरवला

ख्यातनाम समीक्षक डॉ.किशोर सानप यांचं रविवारी नागपुरात निधन झाल आहे. ते ७६ वर्षाचे होते. त्यांच्यावर मानेवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सानपांच्या निधनाने साहित्य विश्वात शोककळा पसरली. प्रसिद्ध समीक्षक डॉ. किशोर सानप यांचे निधनामुळे संत साहित्याचा व्यासंगी अभ्यासक हरवला आहे. उस्मानाबाद इथे २०१७ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढविली होती. पांगुळवाडा ही त्यांची […]

संत साहित्याचा व्यासंगी अभ्यासक हरवला

ख्यातनाम समीक्षक डॉ.किशोर सानप यांचं रविवारी नागपुरात निधन झाल आहे. ते ७६ वर्षाचे होते. त्यांच्यावर मानेवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सानपांच्या निधनाने साहित्य विश्वात शोककळा पसरली. प्रसिद्ध समीक्षक डॉ. किशोर सानप यांचे निधनामुळे संत साहित्याचा व्यासंगी अभ्यासक हरवला आहे.

उस्मानाबाद इथे २०१७ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढविली होती. पांगुळवाडा ही त्यांची अत्यंत चर्चित कादंबरी होती. सानप यांची एक व्यासंगी समीक्षक म्हणून त्यांची साहित्य जगतास ओळख होती. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. गुरुकुंज येथे २०२३ मध्ये आयोजित केलेल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सानप यांनी गोंदिया येथील विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number