Vidyananda Bapat: ; ‘वैचारिक प्रतिवादाऐवजी वैयक्तिक हल्ला..’ विद्यानंद बापट यांची सडेतोड प्रतिक्रिया; म्हणाले, ‘जिवंत राहिलो तर..’

सार्वजनिक सणांच्या नावाखाली नागरिकांवर लादले जाणारे ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीची कोंडी याविरोधात बापट यांनी आवाज उठवला आहे.

Vidyananda Bapat: ; ‘वैचारिक प्रतिवादाऐवजी वैयक्तिक हल्ला..’ विद्यानंद बापट यांची सडेतोड प्रतिक्रिया; म्हणाले, ‘जिवंत राहिलो तर..’

Vidyanand Bapat Pune DJ dispute: पुण्यातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आणि डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला ठाम विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर त्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. पत्रकारांशी थेट संवाद साधत असताना झालेल्या मारहाणीनंतर शुक्रवारी माध्यमांसमोर येत त्यांनी आपला निर्धार अधिक पक्का केला. ‘अशा मारहाणीने किंवा वैयक्तिक टीकेने माझा लढा थांबणार नाही. जे लोक मुद्द्यांचा तार्किक आणि वैचारिक प्रतिकार करू शकत नाहीत, तेच अशा प्रकारची गुंडगिरी आणि माकडचाळे करतात,’ अशा कडक शब्दांत त्यांनी हल्लेखोरांना ठणकावले.

‘मी जिवंत राहिलो तरच…’; रविवारी निघणाऱ्या मोर्चाबाबत मोठे वक्तव्य
सार्वजनिक सणांच्या नावाखाली नागरिकांवर लादले जाणारे ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीची कोंडी याविरोधात बापट यांनी आवाज उठवला आहे. ‘पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणायचे आणि दुसरीकडे विचार मांडणाऱ्यांवर हात उचलायचा, ही कोणती संस्कृती?’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या लढ्याला आता व्यापक संघटनात्मक रूप देण्याचा विचार सुरू असून, रविवारी गोपाळ कृष्ण गोखले चौकातून (गुडलक हॉटेल) नागरिकांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चावर बोलताना, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर देखील सकाळी नेहमीसारखेच बाहेर पडले होते… मी रविवारी जिवंत राहिलो, तर नक्कीच या मोर्चात सहभागी होईन,’ असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले.

हेही वाचा – Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : “प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार” बापट यांना मारहाण; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

3 तासांत आरोपीला अटक; 24 तास पोलीस सुरक्षा लागू
गुरुवारी थेट कॅमेऱ्यासमोर विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाण नावाच्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या 3 तासांत बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेला आरोपी कोथरूड परिसरातील एका गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असून, त्याच्यावर यापूर्वी 5 ते 6 गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाने नारायण पेठेत राहणाऱ्या विद्यानंद बापट यांना सुरक्षेच्या कारणास्तव 24 तास पोलीस संरक्षण पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

डीजेविरोधातील आंदोलनाला पुणेकरांचा वाढता पाठिंबा
या हल्ल्याच्या घटनेनंतर सोशल मीडियावरून आणि सार्वजनिक वर्तुळातून बापट यांच्या भूमिकेला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या या कृत्याचा पुणेकरांनी तीव्र निषेध केला आहे. रविवारी निघणाऱ्या नागरिक मोर्चाच्या माध्यमातून डीजे आणि लाऊडस्पीकरच्या अनिर्बंध वापरावर बंदी आणण्याची मागणी अधिक तीव्र केली जाणार असून, यामुळे पुण्यातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा वाद आता अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा – Vidyanand Bapat: ‘फार स्पष्ट मराठी बोलू नका’; विद्यानंद बापटांना मारहाण प्रकरणात अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल, नेमकं काय म्हणाली?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number