Drugs Overdose : लाईव्ह कॉन्सर्टला ड्रग्जचा विळखा; भर कार्यक्रमात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

गोरेगाव नेस्को संकुलातील लाइव कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Drugs Overdose : लाईव्ह कॉन्सर्टला ड्रग्जचा विळखा; भर कार्यक्रमात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

मुंबई : गोरेगाव नेस्को संकुलातील लाइव कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात ही घटना घडली आहे. नेस्को संकुलात आयोजित कार्यक्रमाला तब्बल 3 ते 4 हजारांची गर्दी उपस्थित होती. नेस्कोकडून आयोजित लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या जमुनालाल कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या लाईव्ह कॉन्सर्टचे नेस्कोकडून आयोजन करण्यात आले होते. या घटनेसंबंधी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ, कॉलेज वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा : HSRP बाबत मोठी अपडेट; हे काम न केल्यास मिळणार नाही PUC , तसेच भरावा लागेल मोठा दंड

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव परिसरात 11 एप्रिल रोजी एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तीन ते चार हजार तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान जास्त प्रमाणात मद्यपान आणि ड्रग्ज घेतल्यामुळे काही तरुणांना त्रास झाला. त्यांची प्रकृती खालवल्यामुळे यातील 2 तरुणींना मुंबईच्या जोगेश्वरी येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number