Mira Bhayandar Election: मिरा-भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांनी गेम फिरवला; भाजपच्या ‘या’ तीन दिग्गज नगरसेवकांनी धरली शिंदे गट शिवसेनेची वाट

श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये भाजपला दिलेल्या धक्का ताजा असताना आता मिरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठे भगदाड पडले आहे.

Mira Bhayandar Election: मिरा-भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांनी गेम फिरवला; भाजपच्या ‘या’ तीन दिग्गज नगरसेवकांनी धरली शिंदे गट शिवसेनेची वाट

Mira Bhayandar Election: मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये भाजपला दिलेल्या धक्का ताजा असताना आता मिरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठे भगदाड पडले आहे. तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या भाजपच्या तीन दिग्गज नगरसेवकांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत भाजपला मोठा हादरा दिला आहे.

मिरा-भाईंदरमध्ये भाजपला खिंडार

निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत भाजपच्या माजी नगरसेविका दिपाली मोकाशी, वीणा भोईर आणि सूर्यकांत भोईर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे या नेत्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असून, त्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – Raj Thackeray: ‘रीलच्या मोहात महाराष्ट्र विकला जातोय?’; राज ठाकरेंचा धक्कादायक इशारा

दरम्यान,  शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या नगरसेविकांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप केले. ‘भाजपामधील काही नेते पक्षाला आपली खाजगी मालमत्ता समजतात. स्थानिक पातळीवर ‘अड्डा’ चालवणाऱ्या नरेंद्र मेहता यांच्या कार्यपद्धतीमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे,’ अशी टीका त्यांनी केली. पक्ष कोणाच्या मालकीचा नसून कार्यकर्त्यांचा असतो, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

हेही वाचा – Tushar Apte Resignation: भाजपचा बदलापुरात यू-टर्न; बदलापूर प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेचा अखेर राजीनामा

अंबरनाथमधील श्रीकांत शिंदेंची ‘फिल्डिंग’

मिरा-भाईंदरच्या या धक्क्यापूर्वी अंबरनाथमध्येही खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपला चितपट केले. अंबरनाथमध्ये भाजपने थेट काँग्रेसशी अनपेक्षित युती करून सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता. मात्र, श्रीकांत शिंदे यांनी चाणाक्ष खेळी करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांना सोबत घेतले आणि भाजपचा मनसुबा धुळीस मिळवला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number