Yugendra Pawar On Ajit Pawar : ’20-20 लाख रुपये देऊन उमेदवार फोडले…’; युगेंद्र पवार यांचा अजित पवारांवर आरोप

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली.

Yugendra Pawar On Ajit Pawar : ’20-20 लाख रुपये देऊन उमेदवार फोडले…’; युगेंद्र पवार यांचा अजित पवारांवर आरोप

Yugendra Pawar On Ajit Pawar : बारामती नगर परिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना, दुसरीकडे ‘बिनविरोध पॅटर्न’ने महाराष्ट्रातच चर्चेला उधाण आले आहे. सत्ताधाऱ्यांचेच उमेदवार विरोधाशिवाय कसे निवडून येतात, यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले, असा दावा युगेंद्र पवारांनी केला आहे.

सर्वांना 20 लाख देऊन फोडलं – युगेंद्र पवार

निवडणूक प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, 'बिनविरोध झालेल्या आठपैकी चार जागांवर आमचे उमेदवार होते. स्थानिकांमध्ये चर्चा आहे की विरोधी गटाने त्यांना प्रत्येकी वीस लाख रुपये दिले. आमचे उमेदवार हे मध्यमवर्गीय, कष्ट करणारे लोक… दहा वर्ष मेहनत केली तरी एवढे पैसे ते कमवू शकणार नाहीत.' युगेंद्र पवारांच्या मते, या पैकी दोन उमेदवार नुकतेच त्यांच्या पक्षात दाखल झाले होते आणि त्यांनी संधी मिळाल्यास चांगले काम करू असे आश्वासनही दिले होते. मात्र मोठ्या आर्थिक प्रलोभनामुळे त्यांनी माघारी घेतली. 

हेही वाचा – Chopada Election : चोपडा नगरपालिकेत राजकीय भूकंप! भाजप सोडून शिंदे गटाची काँग्रेसला साथ

दरम्यान, युगेंद्र पवार यांनी पुढे म्हटलं आहे की, 'आमचे उमेदवार हे छोटे व्यवसायिक, उच्चशिक्षित आणि चांगली प्रतिमा असलेले तरुण आहेत. पण सत्ताधाऱ्यांकडे सत्ता, पैसा, संस्था सर्व काही असल्याने सामान्य लोकांवर दबाव येतो. जो साधा माणूस असतो तो घाबरून जातो.' लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली असून, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही तोच पॅटर्न दिसत असल्याचा दावाही यावेळी युगेंद्र पवार यांनी केला आहे.  

हेही वाचा – Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर नाराजी कायम; सभेत अंतर ठेवून बसले, कारण काय?

तथापी, युगेंद्र पवार यांनी बारामतीकरांना आवाहन करताना म्हटले की, 'या वेळेला सामान्य घरातील, लोकांमध्ये मिसळून राहणाऱ्या, शिक्षित उमेदवारांना संधी द्या. मजबूत विरोधी पक्ष जिवंत राहणं आवश्यक आहे. लोकशाही टिकवायची असेल तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांना पाठिंबा द्या.'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number