Donald Trump: ‘भारतासारखी पारदर्शकता अमेरिकेतही हवी…’; ट्रम्प यांच्याकडून भारतीय मतदान प्रक्रियेचे कौतुक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या सर्वसमावेशक निवडणूक यंत्रणेचे जाहीर कौतुक केले

Donald Trump: ‘भारतासारखी पारदर्शकता अमेरिकेतही हवी…’; ट्रम्प यांच्याकडून भारतीय मतदान प्रक्रियेचे कौतुक

Donald Trump:  अमेरिकेच्या राजकीय पटलावर भारतीय मतदान प्रक्रियेच्या शिस्तबद्धतेची आणि सुरक्षिततेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या सर्वसमावेशक निवडणूक यंत्रणेचे जाहीर कौतुक केले असून, अमेरिकेतील मतदान पद्धती अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी ‘SAVE America Act’ हा कायदा संमत करण्याचा आग्रही पुनरुच्चार केला आहे. आपल्या ‘Truth Social’ या सोशल मीडिया मंचावरील संदेशात त्यांनी भारतीय प्रणालीचे अनेक महत्त्वपूर्ण पैलू अधोरेखित केले आहेत.

भारतीय मुख्य निवडणूक आयुक्तांशी संवाद आणि महत्त्वाचा सवाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी झालेल्या संवादात एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. अमेरिकेत मतदानादरम्यान वैध फोटो ओळखपत्राची सक्ती का नाही, असा प्रश्न भारतीय प्रशासनाकडून उपस्थित करण्यात आल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी केला. भारतामध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल 64.6 कोटी मतदारांनी आपला हक्क बजावला. या भव्य प्रक्रियेत प्रत्येक नागरिकासाठी अधिकृत फोटो ओळखपत्र अनिवार्य होते. तसेच, टपाल मतदानाचा (Postal Ballot) वापर केवळ 1 टक्के पेक्षा कमी मतदारांनी केला, या आकडेवारीकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधले. याच धर्तीवर अमेरिकेतही कायदे कठोर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

‘SAVE America Act’ द्वारे प्रस्तावित बदल
व्हाईट हाऊस आणि समर्थकांच्या मते, ‘Safeguard American Voter Eligibility’ म्हणजेच ‘SAVE America Act’ मुळे अमेरिकेच्या निवडणूक चौकटीत मोठे सकारात्मक बदल घडतील. या कायद्यांतर्गत केवळ अधिकृत अमेरिकन नागरिकांनाच संघराज्यीय निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार राहील. नोंदणीच्या वेळी नागरिकत्वाचा पुरावा सादर करणे बंधनकारक असेल. याशिवाय, गैरप्रकार टाळण्यासाठी टपाल मतदानावर कडक निर्बंध आणले जातील. मात्र, लष्करी जवान, दिव्यांग, आजारी व्यक्ती आणि प्रवाशांना यात सवलत दिली जाईल. सर्व राज्यांनी मतदार यादीतून बिगर-नागरिकांची नावे वगळावीत, असाही या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा – CM Devendra Fadnavis : आता अंतिम निर्णय फडणवीसांचा! मंत्र्यांच्या निर्णयांना ब्रेक लावण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे; नव्या GR ने नेमकं काय बदललं?

राजदूतांचा पाठिंबा आणि भारत-अमेरिका मैत्रीचा पुनरुच्चार
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी देखील ‘X’ मंचावरून ट्रम्प यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. भारताच्या 646 दशलक्ष मतदारांच्या ओळखपत्राच्या उदाहरणाचा हवाला देत त्यांनी अमेरिकन काँग्रेसने हा कायदा त्वरित मंजूर करण्याची मागणी केली. यासोबतच ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील दृढ संबंधांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, ट्रम्प हे पंतप्रधान मोदींचे खंबीर मित्र आहेत आणि भारत-अमेरिका सहकार्य 100 टक्के मजबूत राहिलेले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number