ZP Election Announced : 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले, मतदान ते निकाल…; संपूर्ण माहिती क्लिकवर

मुंबई : राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रया पार पडणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार आहेत. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. रायगड, रत्नगिरी, सिधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, परभणी व […]

ZP Election Announced : 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले, मतदान ते निकाल…; संपूर्ण माहिती क्लिकवर

मुंबई : राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रया पार पडणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार आहेत. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. रायगड, रत्नगिरी, सिधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, परभणी व लातूर या ठिकाणी निवडणूक होत आहे.
 

हेही वाचा : Municipal Elections: महापालिका निवडणुकीपूर्वी राजकारण पेटलं! कुठे कार्यकर्त्यांची मारामारी, तर कुठे पैशांचा पाऊस; व्हायरल व्हिडीओंमुळे वातावरण तापलं

50 टक्क्यांच्या आत आरक्षण  असलेल्या निवडणुका होणार आहेत. 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल. या निवडणुकीत दोन मते द्यायची आहेत.  एक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाला द्यावी लागेल.  नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाईन असेल, यासोबतच जातवैधता पडताळणी आवश्यक आहे. ती नामनिर्देशन पत्रासोबत द्यायची  आहे.

महत्त्वाच्या बाबी आणि तारखा –

एकूण मतदार – 2.09 कोटी

एकूण महिला मतदार –  1.03 कोटी

एकूण पुरूष मतदार – 1.07 कोटी

इतर – 473

मतदान केंद्र – 25,482

नामनिर्देश पत्र – 16 जानेवारी 2026

छाननी – 22 जानेवारी 2026

उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत – 27 जानेवारी 2026 (दुपारी ३ वाजेपर्यंत)

अंतिम यादी आणि चिन्ह वाटप – 27 जानेवारी 2026 (दुपारी ३ वाजेपर्यंत)

मतदान केंद्रावर सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध असतील. पिंक मतदान केंद्रावर सर्व महिला मतदार असतील.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number