Gunratna Sadavarte: ‘जरांगेंना आमदारकी देणारा पक्ष कोसळेल…’; गुणरत्न सदावर्ते यांचा घणाघात

बीड जिल्ह्याचा आणि नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत सदावर्ते म्हणाले की, बीडमध्ये काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे.

Gunratna Sadavarte: ‘जरांगेंना आमदारकी देणारा पक्ष कोसळेल…’; गुणरत्न सदावर्ते यांचा घणाघात

Gunratna Sadavarte: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या राजकीय भूमिकेवरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. “ज्या जरांगे पाटलांना स्वतःची ग्रामपंचायत निवडून आणता येत नाही, त्यांना जर कोणत्या पक्षाने आमदारकी दिली, तर तो पक्ष पूर्णपणे कोसळून जाईल,” अशा शब्दांत सदावर्ते यांनी जरांगे यांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ग्रामपंचायतीचा दाखला देत जरांगेंवर टीका
बीड जिल्ह्याचा आणि नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत सदावर्ते म्हणाले की, बीडमध्ये काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे. परवा ‘मस्साजोग’मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जरांगे पाटील आपला प्रभाव दाखवू शकले नाहीत. जे नेते एक ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत, त्यांच्या पुढाकाराने कोणी आमदार होईल ही चर्चाच व्यर्थ आहे. अशा व्यक्तीला आमदारकी देणारा किंवा त्यांच्या जिवावर राजकारण करणारा कोणताही पक्ष राजकीयदृष्ट्या संपून जाईल, असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचे केले समर्थन
एकीकडे जरांगे पाटलांवर टीका करतानाच, सदावर्ते यांनी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याबद्दल मात्र सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. “प्रत्येकाची भावना असते की आपल्या नेत्याने मंत्री व्हावे. मुंडे कुटुंबीय हे सामान्य जनतेपर्यंत जाऊन काम करणारे लोक आहेत. मग ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे असोत, धनंजय मुंडे असोत किंवा पंकजा मुंडे असोत, हे सर्वजण जमिनीवर काम करणारे लोक आहेत,” असे सदावर्ते म्हणाले.

हेही वाचा – Sharad Pawar: ‘AI स्विकारा, रयत संस्था जागतिक पातळीवर पोहोचवा’; अध्यक्षपदी फेरनिवडी होताच शरद पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

बिडकरांना होईल आनंद
धनंजय मुंडे यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक करताना सदावर्ते पुढे म्हणाले की, “धनंजय मुंडे जर मंत्री झाले, तर आम्हाला आणि सर्व बिडकरांना त्याचा नक्कीच मोठा आनंद होईल.” बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या कामासाठी मुंडे कुटुंबीयांचे योगदान मोठे असल्याचे सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचे जोरदार समर्थन केले आहे. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या राजकीय प्रवाहावर भाष्य केल्यामुळे सदावर्ते यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number