Maharashtra Government : लग्नपत्रिकेवरती आता नवरा नवरीच्या नावापुढे ही जन्मतारीख लिहावी लागणार? राजस्थान निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने बालविवाह रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. लग्नपत्रिकेवरती आता नवरा नवरीच्या नावापुढे ही जन्मतारीख लिहावी लागणार आहे.

Maharashtra Government : लग्नपत्रिकेवरती आता नवरा नवरीच्या नावापुढे ही जन्मतारीख लिहावी लागणार? राजस्थान निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने बालविवाह रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. लग्नपत्रिकेवरती आता नवरा नवरीच्या नावापुढे ही जन्मतारीख लिहावी लागणार आहे. राजस्थान सरकारच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकार ही घेणार निर्णय असून लवकरच नियम लागू करणार आहेत. बालविवाहाच धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा- Raj Thackeray: 'मराठी शिका, अन्यथा चेहऱ्यावर बाराखडी…'; मराठीच्या मुद्द्यावरून राहुल नार्वेकर यांना राज ठाकरेंचा इशारा

राज्यातील अनेक जिल्ह्यांत बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती विधानसभेत सरकारकडून सादर केली आहे. यात परभणी जिल्हात  48% मुलींचे अल्पवयात लग्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच बीडमध्ये 43.7%, धुळ्यात 40.5% आणि सोलापुरात 40.3% मुलींचे 18 वर्षांपूर्वी विवाह झाल्याची माहिती आहे.

बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर परिणाम होत असल्याच सरकारकडून मान्य झाले आहे. बालविवाह रोखण्यासाठी राज्यात कायदा, नियम व विशेष जनजागृती मोहीम राबविली जात असल्याची माहिती असून राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या प्रस्तावाचा सरकारकडून अभ्यास सुरू आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number