Supriya Sule On NCP Alliance : ‘अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, पण…’; पुण्यातील राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी युतीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याऐवजी नवा सस्पेन्स निर्माण केला.

Supriya Sule On NCP Alliance : ‘अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, पण…’; पुण्यातील राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule On NCP Alliance: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, मात्र आमची चर्चा सुरू आहे, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. या विधानामुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'पवार साहेबांचा शब्द अंतिम' – सुप्रिया सुळे

पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी युतीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याऐवजी नवा सस्पेन्स निर्माण केला. त्या म्हणाल्या, 'आम्ही पुण्याच्या विकासासाठी समविचारी पक्षांशी चर्चा करत आहोत. अद्याप कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, पण शरद पवार जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असेल.' त्यांच्या या सावध पवित्र्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

हेही वाचा – Prashant Jagtap NCP : प्रशांत जगताप यांनी दिला राष्ट्रवादी पवार गटाला राजीनामा, 'पक्षाच्या विरोधात…'

प्रशांत जगतापांची नाराजी आणि सुळेंचे स्पष्टीकरण

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेमुळे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले होते. यावर सुप्रिया सुळे यांनी रोखठोक भाष्य केले. 'समाजात काम करताना नाराजी घरापर्यंत मर्यादित असायला हवी. लोकशाहीत कार्यकर्त्यांची मते महत्त्वाची असतात आणि जगतापांचे प्रश्नही रास्त आहेत. पण निवडणूक ही प्रदूषणाच्या आणि पाण्याच्या प्रश्नावर लढायची की आपापल्या वादावर, हे ठरवावे लागेल,' असे म्हणत त्यांनी जगतापांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – Kudal Court Arrest Warrant : मंत्री नितेश राणेंना कुडाळ न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी; दोन आमदारांनाही दणका

ठाकरे बंधूंच्या युतीचे स्वागत, मुंबईत मात्र 'ट्विस्ट'

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील ऐतिहासिक युतीबद्दल सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला. दोन भाऊ एकत्र आले याचा आनंदच आहे, असे त्या म्हणाल्या. मात्र, मुंबईत राजकीय समीकरणे बदलली आहेत. ठाकरेंनी मनसेशी हातमिळवणी केल्यानंतर शरद पवार गटाने शिवसेना (UBT) सोबतची चर्चेची गाडी थांबवल्याचे वृत्त आहे. आता मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी (SP) काँग्रेससोबत स्वतंत्र आघाडी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. सुप्रिया सुळे यांनी यावेळी पुण्याच्या मूलभूत समस्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. निवडणुका येतील आणि जातील, पण पुण्याच्या 24 तास पाण्याचे आणि टँकर लॉबीचे काय? आजही अनेक सोसायट्यांमध्ये टँकरने पाणी येते. आम्ही केवळ युतीच्या चर्चांत वेळ न घालवता विकासाच्या मुद्द्यावर मैदानात उतरू,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number