Murlidhar Mohol Surgery: 29 वर्षांपूर्वीची मैदानातील ‘ती’ जखम पुन्हा बळावली; मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया; महिनाभर राहणार विश्रांतीवर

कुस्ती खेळताना 29 वर्षांपूर्वी झालेल्या एका जुन्या दुखापतीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

Murlidhar Mohol Surgery: 29 वर्षांपूर्वीची मैदानातील ‘ती’ जखम पुन्हा बळावली; मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया; महिनाभर राहणार विश्रांतीवर

Murlidhar Mohol Surgery: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील एक महिना सक्रिय राजकारणातून सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. कुस्ती खेळताना 29 वर्षांपूर्वी झालेल्या एका जुन्या दुखापतीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ते आता महिनाभर सार्वजनिक कार्यक्रमांपासून लांब राहतील.

शस्त्रक्रियेचे कारण काय?
मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 1997 १९९७ मध्ये कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना त्यांना गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळेच त्यांचा कुस्तीचा प्रवास थांबला आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. अनेक वर्षे या त्रासाकडे दुर्लक्ष केले, परंतु गेल्या काही दिवसांपासून हे दुखणे असह्य झाले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

‘दुखापतीपेक्षा कामाला मुकल्याची रुखरुख जास्त’
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचेही वारे वाहत आहेत. अशा महत्त्वाच्या वेळी विश्रांती घ्यावी लागल्याबद्दल मोहोळ यांनी हळहळ व्यक्त केली. “दुखापतीच्या त्रासापेक्षा संसदेत उपस्थित राहता न येणे आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मुकावे लागल्याची रुखरुख अधिक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा – सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची विधानभवनात बैठक ; मुख्यमंत्री फडणवीस यांना पुरोहित संघ,नाशिक महानगर पालिका व नाशिककरांकडून ध्वजारोहणाचे निमंत्रण

पुणेकरांना दिला विश्वास
शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून लवकरच पूर्ण क्षमतेने पुन्हा एकदा पुणेकरांच्या सेवेत हजर होईन, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पुढील काही दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली विश्रांती घेतील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number