Tamilnadu Election: तमिळनाडूत ‘विजय’ भाजपकडे येणार? दक्षिणेतील राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता

या वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात असून थलापती विजय यांची नजर मुख्यमंत्रीपदावर असल्याचे समजते. येत्या काही दिवसांत विजय एनडीएमध्ये जाणार की नाही, ते स्पष्ट होईल.

Tamilnadu Election: तमिळनाडूत ‘विजय’ भाजपकडे येणार? दक्षिणेतील राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता

Tamilnadu Election: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता असतानाच, दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय आणि त्यांच्या 'तमिळगा वेट्री कझगम' (TVK) पक्षाबाबत एक चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष (BJP) विजय यांच्याशी युती करण्यासाठी अत्यंत सक्रिय झाला असून, त्यांना एनडीए (NDA) मध्ये सामील करून घेण्यासाठी एक मोठी 'ऑफर' देण्यात आली आहे. तमिळनाडूच्या राजकारणात आजवर फक्त AIADMK आणि DMK या दोनच पक्षांचे वर्चस्व राहिले आहे, परंतु विजय यांच्या प्रवेशामुळे यावेळेस तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

उपमुख्यमंत्रिपद आणि 80 जागांचा मोठा प्रस्ताव
भाजपच्या रणनीतीकारांनी विजय यांच्या पक्षाला युतीसाठी 80 जागांची ऑफर दिल्याचे वृत्त आहे. इतकेच नाही तर, निवडणूक जिंकल्यानंतर विजय यांना तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्तावही देण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात असून, दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एका दुसऱ्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची मध्यस्थ म्हणून मदत घेतली जात आहे. तथापि, थलापती विजय यांची नजर मुख्यमंत्रीपदावर असल्याचे समजते, ज्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत हा मुद्दा सध्या कळीचा ठरला आहे.

हेही वाचा – Assembly Election 2026: 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं; निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

विजय यांचा मोठा चाहता वर्ग आणि व्होट बँकेचे गणित
भाजपला विजय यांच्या 'फॅन बेस'मध्ये विशेष रस आहे. तमिळनाडूत विजय यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असून, या व्होट बँकेचा 2 टक्के हिस्सा जरी युतीकडे वळला, तरी अनेक जागांच्या निकालांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. तमिळनाडूच्या निवडणुकीत अनेकदा विजयाचे अंतर खूप कमी असते, त्यामुळे विजय यांची साथ भाजपला राज्यात पाय रोवण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. मात्र, विजय यांचे काही सल्लागार या युतीबाबत चिंतेत आहेत. सुरुवातीला स्वतंत्र पर्याय म्हणून राजकारणात आलेल्या विजय यांनी लगेच राष्ट्रीय पक्षाशी हातमिळवणी केल्यास त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होईल, अशी भीती त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत आहे.

राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे
जर हा करार यशस्वी झाला, तर तमिळनाडूच्या राजकारणात हा एक ऐतिहासिक बदल ठरेल. विजय यांनी आपल्या पक्षाला राज्यात एक नवा पर्याय म्हणून सादर केले आहे. एनडीएमध्ये सामील झाल्यास त्यांची स्वतंत्र ओळख टिकवून ठेवणे हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान असेल. दुसरीकडे, भाजप विजय यांच्या माध्यमातून द्रविड राजकारणाच्या बालेकिल्ल्यात आपले स्थान भक्कम करू पाहत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच या संभाव्य युतीमुळे सत्ताधारी DMK आणि विरोधी पक्ष AIADMK यांच्या गोटातही हालचाली वेगवान झाल्या आहेत.

हेही वाचा – Financial Rule Change: नवे आर्थिक वर्ष, नवे टॅक्स नियम; 1 एप्रिलपासून 'हे' बदल तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number