Suprime Court On Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? तिढा कायम; सुप्रीम कोर्टानं अंतिम युक्तिवादासाठी दिली पुढची तारीख

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. गुरूवारी या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली असून सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांना युक्तीवाद करण्यासाठी पुढची तारीख दिली आहे. आता या प्रकरणी 1 एप्रिल रोजी सुनावणी पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली […]

Suprime Court On Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? तिढा कायम; सुप्रीम कोर्टानं अंतिम युक्तिवादासाठी दिली पुढची तारीख

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. गुरूवारी या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली असून सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांना युक्तीवाद करण्यासाठी पुढची तारीख दिली आहे. आता या प्रकरणी 1 एप्रिल रोजी सुनावणी पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पुढील सुनावणीत उद्धव ठाकरे पक्षाकडून युक्तिवादाला सुरुवात होईल. सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुनावणीसाठी दीड तासांचा वेळ निश्चित केला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील गुरुवारची सुनावणी संपली. या दरम्यान, शिवसेनेकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून म्हणजे ठाकरे आणि शिंदे गटाकडून अंतिम युक्तिवादाची तयारी दर्शवण्यात आली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता त्यावर पुढच्या तारखेला सुनावणी होईल असं स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा : Anil Parab: ‘प्रकरण अंगाशी आलं म्हणून महापौरबाईंनी पत्र मागे घेतलं…’; बदल्यांच्या मुद्द्यावरून अनिल परब यांची रितू तावडेंवर टीका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number