Shiv Sena Uddhav Thackeray: ठाकरे गटातल्या बेस्ट समिती सदस्याची शिंदे सेनेच्या बैठकीत उपस्थिती; राजकीय वर्तुळात खळबळ

सोमवारी विधानभवनात उपसभापती सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे सेनेची एक महत्त्वाची बैठक झाली. या वेळी ठाकरे सेनेतील एक नेते उपस्थित होते.

Shiv Sena Uddhav Thackeray: ठाकरे गटातल्या बेस्ट समिती सदस्याची शिंदे सेनेच्या बैठकीत उपस्थिती; राजकीय वर्तुळात खळबळ

Shiv Sena Uddhav Thackeray: विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला राम राम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या राजकीय भूकंपानंतर एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्यावर मुंबईत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याची मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईत शिंदे सेनेचा प्रभाव वाढवण्यासाठी सचिन अहिर हे आता पूर्णपणे 'ॲक्शन मोड'मध्ये आले आहेत.

विधानभवनातील बैठकीत बेस्ट समिती सदस्य सुनील अहिरांची थेट हजेरी
सोमवारी विधानभवनात उपसभापती सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे सेनेच्या माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. ठाकरे सेनेच्या कोट्यातून बेस्ट (BEST) समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त झालेले सुनील अहिर यांनी या बैठकीला थेट उपस्थिती लावली. ठाकरे गटाचे अधिकृत सदस्य असूनही सुनील अहिर यांनी शिंदे सेनेच्या बैठकीला लावलेल्या या हजेरीमुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – Nanded Bank Election : मुख्यमंत्र्यांचा नांदेडच्या खासदारांना एक फोन अन् भाजप आमदाराच्या गळ्यात पडली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ; नेमकं काय घडलं?

ठाकरे सेनेचा राजीनामा की हकालपट्टी? काय असणार पुढील पाऊल
मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुनील अहिर यांची बेस्ट समितीवर निवड करण्यात आली होती. सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशानंतर सुनील अहिर हे देखील आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देतील किंवा ठाकरे सेनेकडून त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली जाईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, कोणत्याही औपचारिक राजीनाम्याशिवाय सुनील अहिर अद्याप ठाकरे गटाच्याच कोट्यातून या पदावर कायम आहेत आणि उघडपणे शिंदे सेनेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.

महापालिका निवडणुकीनंतर ताकद वाढवण्यासाठी शिंदेंचे नवे रणनीतीपेच
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाने 65 जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले होते. तर दुसरीकडे, पक्षाचे नाव आणि चिन्ह असूनही शिंदे गटाला मुंबईत अपेक्षित यश मिळवता आले नव्हते. हाच अनुशेष भरून काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आता मुंबईत आपली रणनीती बदलली आहे. ठाकरे गटातील आक्रमक आणि मुंबईच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या नेत्यांना सोबत घेऊन पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न शिंदे सेनेकडून जोरात सुरू आहे.

हेही वाचा – Pravin Darekar On Pratap Sarnaik : "शिवसेनेतील नेत्यांनी महायुतीतलं वातावरण बिघडवू नये" सरनाईकांच्या वक्तव्यनंतर दरेकरांचा थेट इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number