Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक

प्रीती संगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी सुनेत्रा पवार यांनी दर्शन घेऊन पुष्पांजली अर्पण केली आणि राज्याच्या सेवेसाठी आशीर्वाद घेतले.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक

कराड: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात पवार कुटुंबाच्या परंपरेनुसार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन करून केली.

प्रीती संगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी सुनेत्रा पवार यांनी दर्शन घेऊन पुष्पांजली अर्पण केली आणि राज्याच्या सेवेसाठी आशीर्वाद घेतले. उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार अधिकृतपणे हाती घेण्यापूर्वी स्मृतिस्थळाला भेट देणे ही पवार कुटुंबाची परंपरा असून, अजित पवार हेही नियमितपणे या स्थळाला भेट देत असत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांसह अनेक वरिष्ठ नेतेदेखील येथे वेळोवेळी उपस्थित राहिले आहेत.

हेही वाचा: Cab Driver Arrested: अवघ्या 400 मीटरसाठी 18 हजार रुपये भाडं; मुंबई पोलिसांचा दणका; सोशल मीडियावरील पोस्टनंतर ‘तो’ टॅक्सी चालक अटकेत

या वेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत माजी खासदार श्रीनिवास पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर सुनेत्रा पवार या विमान अपघातात निधन झालेल्या पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. विदीप जाधव हे अजित पवार यांच्यासोबत वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) म्हणून कार्यरत होते आणि दुर्दैवी अपघातात त्यांचेही निधन झाले.

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनानंतर सुनेत्रा पवार या वेणूताई चव्हाण सभागृहात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होत्या. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. या संपूर्ण घडामोडींची माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी दिली.

हेही वाचा: Children Missing Case: मुंबई हादरली! गेल्या 36 तासांत 12 मुले बेपत्ता; पालकांमध्ये भीती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number