Maratha Reservation: राज्य सरकार अलर्ट मोडवर; मनोज जरांगेंच्या उपोषणावर 24 तासांत तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग

उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी असलेल्या जुन्या वैयक्तिक मैत्रीचा संदर्भ देत त्यांना एक खास आवाहन केले आहे.

Maratha Reservation: राज्य सरकार अलर्ट मोडवर; मनोज जरांगेंच्या उपोषणावर 24 तासांत तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग

Maratha Reservation: अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. या संवेदनशील पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महायुती सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. "शासन मराठा समाजाच्या सर्व रास्त मागण्यांच्या पूर्ण पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मी स्वतः जरांगे पाटलांच्या सतत संपर्कात असून, येत्या 1 ते 2 दिवसांत त्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे," अशी माहिती सामंत यांनी दिली. तसेच, पुढील 24 तासांच्या कालावधीत मराठा आरक्षणाबाबत योग्य व सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा महत्त्वपूर्ण दावा त्यांनी केला.

गैरसमजातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर टीका करू नये: उदय सामंत

उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी असलेल्या जुन्या वैयक्तिक मैत्रीचा संदर्भ देत त्यांना एक खास आवाहन केले आहे. "आंदोलने आणि राजकारणाच्या पलीकडे आमचे स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळेच मी त्यांना विनंती करतो की, कोणाच्याही अपुऱ्या माहितीवर अथवा गैरसमजावर विश्वास ठेवून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोणतीही आक्षेपार्ह विधाने करू नयेत," असे सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी नेहमीच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असून, जरांगे पाटलांनी त्यांच्याविषयीचा गैरसमज दूर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

परभणीतील शेतकरी मेळावा हा प्रतिआंदोलन नव्हता; सामंतांचा खुलासा

परभणी येथील शेतकरी व युवा मेळाव्यावरून निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना सामंत म्हणाले की, हा कार्यक्रम जरांगे यांच्या उपोषणाला उत्तर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला नव्हता. "हा मेळावा मागील 2 महिन्यांपूर्वीच, म्हणजेच 7 जुलै रोजी नियोजित होता. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो पुढे ढकलावा लागला होता. त्यामुळे या मेळाव्याद्वारे मराठा समाजाला किंवा आंदोलनाला कमी लेखण्याचा कोणताही हेतू नव्हता," असे त्यांनी नमूद केले. खासदार बंडू जाधव यांनीही वेळोवेळी जरांगे पाटलांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा – Sonam Wangchuk on Abhijeet Dipke: 'ते काही संत नाहीत, भविष्यात ते भ्रष्ट होणार…'; अभिजीत दीपके आणि सहकाऱ्यांबद्दल सोनम वांगचुक यांचे रोखठोक विधान

आरक्षणापेक्षा आरोग्याची काळजी महत्त्वाची; शिंदेंच्या संदेशाचा हवाला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावना व्यक्त करताना सामंत यांनी सांगितले की, "शिंदे साहेबांचा मला विशेष फोन आला होता. आंदोलने आणि मागण्या आपल्या जागी सुरूच राहतील, परंतु मनोज जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची सर्वात आधी काळजी घेतली पाहिजे, अशी काळजी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे." महायुती सरकार मराठा आरक्षणाच्या मार्गात कधीही अडथळा आणणार नाही, उलट जरांगे यांच्या आरोग्याची आणि समाजाच्या हिताची काळजी घेणारे हे नेतृत्व आहे, अशी ग्वाही देत सामंतांनी जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number