Sonam Wangchuk on Abhijeet Dipke: ‘ते काही संत नाहीत, भविष्यात ते भ्रष्ट होणार…’; अभिजीत दीपके आणि सहकाऱ्यांबद्दल सोनम वांगचुक यांचे रोखठोक विधान

प्रसिद्ध पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या प्रमुख नेत्यांबद्दल एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

Sonam Wangchuk on Abhijeet Dipke: ‘ते काही संत नाहीत, भविष्यात ते भ्रष्ट होणार…’; अभिजीत दीपके आणि सहकाऱ्यांबद्दल सोनम वांगचुक यांचे रोखठोक विधान

Sonam Wangchuk on Abhijeet Dipke: प्रसिद्ध पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या प्रमुख नेत्यांबद्दल एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. एका पॉडकास्ट कार्यक्रमात बोलताना वांगचुक म्हणाले की, 'अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा नक्कीच आहेत. ते काही असे संत नाहीत, ज्यांना कशाचीच अपेक्षा नाही. भविष्यात ते भ्रष्ट होणार नाहीत किंवा राजकीयदृष्ट्या स्वार्थी नसतील याची कोणतीही हमी देता येत नाही.' कारण मानवी स्वभावाबद्दल पूर्णपणे भाकीत करणे कठीण असते, असेही त्यांनी नमूद केले.

व्यासपीठाची पवित्रता जपण्याचा आणि दबाव गट म्हणून काम करण्याचा सल्ला
वांगचुक यांनी स्पष्ट केले की, तरुणांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा असणे हे अजिबात चुकीचे नाही. परंतु, त्यांनी सुरू केलेले व्यासपीठ पक्षीय राजकारणापासून दूर राहिले पाहिजे. हे व्यासपीठ सुरुवातीला राजकीय पक्ष म्हणून स्थापन करण्यात आलेले नाही, त्यामुळे त्याची निष्पक्षता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. या आंदोलनाला सामान्य जनता आणि विद्यार्थी भाजप, काँग्रेस किंवा आम आदमी पक्षाचा भाग न मानता एक स्वतंत्र विद्यार्थी चळवळ म्हणून पाहतात. त्यामुळे व्यासपीठाची पवित्रता जपल्यास लोकांचा त्यावर अधिक विश्वास राहील. भविष्यात राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी नवीन पक्ष स्थापन करण्याचा पर्याय त्यांच्याकडे खुला आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

हेही वाचा – Abhijit Dipke: ‘मंत्र्यांच्या मुलांना हेच खायला देता का?’ शाळेत मुदत संपलेले मसाले, पिण्याच्या पाण्याचीही दुरवस्था; अभिजीत दिपकेंनी उघड केलं वास्तव

चळवळीला राजकीय रंग देण्यावर चिंता अन् वैयक्तिक लक्ष
आंदोलनादरम्यान अनेक नागरिक थेट भेटून विचारणा करत असत, याकडे वांगचुक यांनी लक्ष वेधले. अनेक लोक या चळवळीला केवळ सोनम वांगचुक यांच्या उपस्थितीमुळे पाठिंबा देत होते. 'दीपके यांनी स्वतःहून राजकीय आकांक्षांबद्दल कधी सांगितले नसले, तरी आपण स्वतः त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत,' असे वांगचुक यांनी सांगितले. 'जर या नेत्यांनी काही चुकीचे पाऊल उचलले, तर जनता त्यांना सोडणार नाही. एका दबावाच्या रूपात काम करणाऱ्या बिगरराजकीय चळवळीद्वारेच मोठे सामाजिक बदल घडवून आणता येतात,' यावर वांगचुक यांनी भर दिला.

आमिर खानच्या दाव्यावर '3 इडियट्स'वरून मारला उपरोधिक टोला
याच पॉडकास्ट दरम्यान वांगचुक यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खानवर उपरोधिक शब्दांत टीका केली. '3 इडियट्स' चित्रपट बनवताना आपण वांगचुक यांना ओळखतही नव्हतो आणि ते पात्र त्यांच्यावर आधारित नव्हते, या आमिरच्या जुन्या दाव्याचा त्यांनी समाचार घेतला. वांगचुक म्हणाले की, चित्रपटापूर्वी आमची अनेकदा भेट झाली होती आणि कल्पनांची देवाणघेवाण झाली होती. आमिर कदाचित त्याच्या 'गजनी' चित्रपटातील पात्रासारखा वागत असावा, ज्याला 'शॉर्ट-टर्म मेमरी लॉस' (अल्पकालीन स्मृतीभ्रंश) झाला होता, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा – CJP And Sonam Wangchuk : सोनम वांगचुक पुन्हा दिसणार CJP च्या आंदोलनात? वांगचुक यांच्या वक्तव्याने खळबळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number