Sunetra Pawar: ‘वहिनी I Love You…’ बालेवाडीतील कार्यक्रमात महिला कार्यकर्तीची साद ऐकताचं सुनेत्रा पवारांच्या ‘या’ कृतीने जिंकली उपस्थितांची मनं

भाषणादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्या काही क्षण अत्यंत भावूक झाल्या.

Sunetra Pawar: ‘वहिनी I Love You…’ बालेवाडीतील कार्यक्रमात महिला कार्यकर्तीची साद ऐकताचं सुनेत्रा पवारांच्या ‘या’ कृतीने जिंकली उपस्थितांची मनं

Sunetra Pawar: पुण्यातील बालेवाडी भागात आयोजित विशेष महाधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाषणादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्या काही क्षण अत्यंत भावूक झाल्या. अजितदादांचा कामावरील निष्ठावान दृष्टिकोन आणि शिस्तप्रिय स्वभावाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, दादांना उगीचच दुःखाचे किंवा भावनांचे प्रदर्शन अजिबात आवडत नसे. त्यांना केवळ ठोस आणि प्रत्यक्ष काम करून दाखवलेले आवडायचे. हे सांगताना व्यासपीठावर एक शांतता पसरली, मात्र स्वतःला सावरत त्यांनी अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा पुनरुच्चार केला.

सभागृहातील उत्स्फूर्त प्रतिसाद आणि 'आय लव्ह यू'चा प्रसंग
दरम्यान, सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे पाहून सभागृहात उपस्थित असणाऱ्या महिला कार्यकर्त्यांमधील एका महिलेने मोठ्या आवाजात "वहिनी, I Love You" अशी उत्स्फूर्त साद घातली. या अचानक आलेल्या आवाजामुळे सभागृहातील वातावरण क्षणात हलकेफुलके झाले. सुनेत्रा पवारांनीही तात्काळ स्मितहास्य करत व्यासपीठावरून "I Love You Too" असे उत्तर दिले. त्यांच्या या अनपेक्षित आणि आपुलकीच्या उत्तराने संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा आणि घोषणांचा कडकडाट झाला. या प्रसंगाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

दोन डिजिटल ॲप्लिकेशन्सचे भव्य लोकार्पण
या महामेळाव्याच्या औचित्याने महिला सक्षमीकरण आणि तरुणांच्या रोजगाराला चालना देण्यासाठी 2 महत्त्वाच्या मोबाईल ॲप्सचे उद्घाटन खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडले. पुणे जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या 'Dada's Udyogini' या ॲपद्वारे जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची डिजिटल बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. तर 'NCP Youth Skill' या ॲपच्या मध्यमातून राज्यातील हजारो नवतरुणांना रोजगार आणि कौशल्याधारित प्रशिक्षण मिळवून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा – Girish Mahajan: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवरून नवा राजकीय वाद; गिरीश महाजनांच्या 'पालकमंत्री' उल्लेखावरून चर्चांना उधाण

महिला व युवा सक्षमीकरणासाठी कटिबद्धतेचा पुनरुच्चार
भाषणाचा शेवट करताना खासदार सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की, अजितदादांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे आणि राज्यातील तळागाळातील घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महिला उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि युवकांच्या हाताला काम देणे, हेच या उपक्रमांचे मुख्य ध्येय असून हीच दादांना खरी आदरांजली ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number