असदुद्दीन ओवेसी यांच्यावर गोळीबार?; एमआयएमच्या दाव्याने नवी खळबळ

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठजवळ असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार केला असल्याची माहिती ओवेसी यांनी ट्विट करत दिली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट केले की, काही वेळापूर्वी माझ्य गाडीवर चिजारसी टोल गेटवर गोळीबार झाला होता. तीन-चार […]

असदुद्दीन ओवेसी यांच्यावर गोळीबार?; एमआयएमच्या दाव्याने नवी खळबळ

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठजवळ असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला.

असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार केला असल्याची माहिती ओवेसी यांनी ट्विट करत दिली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट केले की, काही वेळापूर्वी माझ्य गाडीवर चिजारसी टोल गेटवर गोळीबार झाला होता. तीन-चार लोकांनी चार राऊंड फायर केल्या. गोळीबार करून त्यांनी तेथून पळ काढला. माझी पंक्चर झाली आहे. पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघून गेलो. या घटनेमुळे आम्हाला सगळ्यांना धक्का बसला आहे, असे त्यांनी ट्विट केले. ओवेसी यांनी ट्विटसोबत त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला असल्याचे छायाचित्र सादर केले आहे.

https://twitter.com/asadowaisi?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1489214781277949957%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fnational%2Ffiring-on-asaduddin-owaisi-car-in-up-3-to-4-rounds-of-bullets-were-fired-at-chhajarsi-toll-plaza-mhcp-664615.html

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी ट्विट केलेल्या छायाचित्रात ओवैसी यांच्या गाडीला छिद्र पडलेली दिसत आहेत. यातील काही छिद्रे प्रवाशाच्या पायाशी आहेत तर एक छिद्र दरवाजाच्या काचेजवळ आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number