Eknath Shinde : अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री शिंदे मोदी-शाहांच्या भेटीला; विरोधकांच्या हाती आयतं कोलीत

मुंबई : सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल, सोमवारपासून दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तर दिल्लीतही संसदेचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळात उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाणे यावरून विरोधकांना मात्र आयतं कोलीत मिळालं आहे. राज्यातील महायुतीचं सरकार जरी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचं असलं तरी तिन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठी हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

Eknath Shinde : अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री शिंदे मोदी-शाहांच्या भेटीला; विरोधकांच्या हाती आयतं कोलीत

मुंबई : सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल, सोमवारपासून दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तर दिल्लीतही संसदेचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळात उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाणे यावरून विरोधकांना मात्र आयतं कोलीत मिळालं आहे. राज्यातील महायुतीचं सरकार जरी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचं असलं तरी तिन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठी हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आहे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यामुळे राज्यात काय सुरू आहे, पुढे काय करायचे, या चर्चांसाठी शिंदे हायकमांडला भेटत असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर केंद्राचं, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच शिवसेनेच्या खासदारांना भेटण्याकरता दिल्लीला जातात, असं विधान शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. त्यामुळे विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : Rajya Sabha Election 2026: बिहार आणि ओडिशात एनडीएची सरशी; नितीश कुमारांसह ‘हे’ दिग्गज विजयी

दरम्यान, एकनाथ शिंदे दिल्लीत आज, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांनी दिल्लीत उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली असून त्यांच्याशी चर्चा केल्या असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number