मुंबई: 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात टोकाची भूमिका घेतली असून, या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळ उध्वस्त करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यासोबतच भारताने नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले.
या दरम्यान, भारताच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे जगभरासह भारतातील अनेक राजकीय नेत्यांनी कौतुक केले आहे. अशातच, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे कौतुक केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये 26 मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. पाकिस्तानचे भारतातील ‘स्लीपर्स सेल’ उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ने ते दाखवून दिले. भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम!’
आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया:
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे कौतुक केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘सर्व प्रकारच्या दहशतवादाचे उच्चाटन करायला हवे. आज रात्री पीओकेमध्ये केलेले अचूक हल्ले दहशतवादाविरुद्ध आहेत आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या ठिकाणांवर अचूक हल्ला केल्याबद्दल भारतीय संरक्षण दलांचे कौतुक. त्यांच्यावर एवढा जोरदार हल्ला करा की दहशतवाद पुन्हा कधीही येऊ शकणार नाही. जय हिंद!’
Terrorism in all its forms has to be eliminated. Tonight’s precision strikes in PoK are against terrorism, and kudos to the Indian defence forces for keeping it precise to sites where terrorism was being harboured. Hit them, hard enough that terrorism doesn’t stand a chance… — Aaditya Thackeray (@AUThackeray) May 6, 2025
संजय राऊत म्हणाले:
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली, ‘भारतीय सेनेचे अभिनंदन! आता थांबायचे नाही. चून चून के मारो! सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. शिवसेना या बैठकीत उपस्थित राहील! जय हिंद!’
भारतीय सेनेचे अभिनंदन!
आता थांबायचे नाही.चून चून के मारो!
सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे.
शिवसेना या बैठकीत उपस्थित राहील!
जय हिंद! pic.twitter.com/IxX9134V4Q — Sanjay Raut (@rautsanjay61) May 7, 2025