शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिडे गुरुजी यांनी घेतली उदयनराजेंची भेट

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिडे गुरुजी यांनी साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस मध्ये ही भेट घेतली आहे. ही भेट कौटुंबिक असल्याची प्रतिक्रिया मत उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. राजकीय निर्णयाबाबत बैठक होती का या बाबत विचारले असता त्यांनी मी राजकारण सोडुन तुमच्या सारख्या मित्रां सोबत फिरण्याचा विचार करतोय अशी […]

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिडे गुरुजी यांनी घेतली उदयनराजेंची भेट

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिडे गुरुजी यांनी साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस मध्ये ही भेट घेतली आहे. ही भेट कौटुंबिक असल्याची प्रतिक्रिया मत उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. राजकीय निर्णयाबाबत बैठक होती का या बाबत विचारले असता त्यांनी मी राजकारण सोडुन तुमच्या सारख्या मित्रां सोबत फिरण्याचा विचार करतोय अशी मिश्किल टिप्पणी उदयनराजेंनी दिली आहे.

भिडे गुरुजी आणि उदयनराजेंची भेट

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे राजकारणांच्या प्रत्येक हालचालींवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची आज भेट झाली. जलमंदिर पॅलेस येथे ही भेट घेण्यात आली.

या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ही भेट कौटुंबिक असल्याची प्रतिक्रिया खासदार उदयनराजेंनी दिली आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा मिळावा यासाठी उदयनराजे प्रयत्न करत असल्याची चर्चा होत आहे.

राजकीय निर्णयाबाबत बैठक होती का या बाबत विचारले असता त्यांनी मी राजकारण सोडुन तुमच्या सारख्या मित्रां सोबत फिरण्याचा विचार करतोय अशी मिश्किल टिप्पणी उदयनराजेंनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number