Shekhar Gore Post: ‘आपण शब्द पाळणारा नेता आहात हे ऐकून होतो पण…’ उमेदवारी हुकल्यानंतर शेखर गोरे यांनी थेट फडणवीसांना विचारला सवाल; पोस्ट व्हायरल

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेखर गोरे यांनी भावनिक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली.

Shekhar Gore Post: ‘आपण शब्द पाळणारा नेता आहात हे ऐकून होतो पण…’ उमेदवारी हुकल्यानंतर शेखर गोरे यांनी थेट फडणवीसांना विचारला सवाल; पोस्ट व्हायरल

Shekhar Gore Post: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत नाराजी आता स्पष्टपणे समोर येऊ लागली आहे. भाजपकडून धैर्यशील कदम यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खटाव-माण परिसरातील प्रभावी नेते देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या भावनिक पत्रामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघासाठी भाजपमध्ये अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. शेखर गोरे, सुनील काटकर, मकरंद देशपांडे आणि धैर्यशील कदम यांच्यात उमेदवारीसाठी चुरस असल्याचे बोलले जात होते. मात्र पक्ष नेतृत्वाने अखेर धैर्यशील कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर शेखर गोरे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: NCP Pune MLC Candidate : पुण्यातील हायव्होल्टेज ड्रामा संपला! अखेर 'या' नेत्याला मिळाला राष्ट्रवादीचा एबी फॉर्म

शेखर गोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्टेटसमध्ये 'साहेब, मी नक्की कुठे चुकलो?' असा थेट सवाल उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी केलेल्या कामांची आणि नेतृत्वासाठी घेतलेल्या भूमिकांची आठवण करून दिली आहे. “तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही राजकीय संघर्ष बाजूला ठेवला, कार्यकर्त्यांना संधी न देता पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

jm

विशेष म्हणजे शेखर गोरे हे मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत. त्यामुळे या नाराजीला राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरच ही नाराजी उघड झाल्याने भाजपच्या स्थानिक नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

शेखर गोरे यांच्या पोस्टनंतर सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपमधील अंतर्गत मतभेद आता सार्वजनिकपणे समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर गोरे यांना पाठिंबा दर्शवला असून उमेदवारी प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: NCP : विक्रम काकडेंच्या उमेदवारी मिळताच पक्षातील पहिला राजीनामा; NCP च्या नेत्यानं अजितदादांची आठवण करून देत केली बोचरी टीका

या निवडणुकीत भाजपसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीकडून अभयसिंह जगताप किंवा बाळासाहेब पाटील यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तानाजीराव पाटील हे देखील मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.

सांगली-सातारा मतदारसंघातील ही निवडणूक आता अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर निर्माण झालेली अंतर्गत नाराजी पुढील राजकीय समीकरणांवर परिणाम करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number