Rohit Pawar: ‘तुकाराम मुंढेंना ड्रग्ज विरोधी पथकाचे…’; रोहित पवारांनी फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी

केवळ जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा या पान मसाला तयार करणाऱ्या मूळ कंपनीच्या मालकावर थेट नोटीस पाठवून कारवाई केली पाहिजे, असे स्पष्ट मत पवार यांनी मांडले.

Rohit Pawar: ‘तुकाराम मुंढेंना ड्रग्ज विरोधी पथकाचे…’; रोहित पवारांनी फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी

Rohit Pawar:  महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासनाने पान मसाल्याच्या जाहिरातीत काम करणाऱ्या अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ या 3 बड्या बॉलिवूड कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या संपूर्ण कारवाईवरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केवळ जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा या पान मसाला तयार करणाऱ्या मूळ कंपनीच्या मालकावर थेट नोटीस पाठवून कारवाई केली पाहिजे, असे स्पष्ट मत पवार यांनी मांडले. यासोबतच, तुकाराम मुंढे ज्या तडफेने पान मसाल्याच्या जाहिरातींवर कारवाई करत आहेत, ते पाहाता त्यांना राज्याच्या अंमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुखपद देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारकडे केली.

प्रशासकीय प्रसिद्धीवरून उपस्थित केलेला सवाल
प्रशासकीय कामकाजावर भाष्य करताना रोहित पवार यांनी मीडियातील एकाधिकारावर टीका केली. केवळ 1 च अधिकारी सातत्याने प्रसारमाध्यमांमध्ये हायलाइट होत असेल, तर इतर निष्ठावंत अधिकारी काय काम करत नाहीत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रशासनात दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या इतर सर्व अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांनाही योग्य ती प्रसिद्धी मिळाली पाहिजे, असे पवार यांनी आवर्जून सांगितले.

हेही वाचा – Non Veg Controversy : मुंबईत मांसाहार वादाला नवे वळण; प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे घेणार थेट राज ठाकरेंची भेट, काय आहे नेमकं प्रकरण?

कुंभमेळा कामांमधील घोटाळ्याचा गंभीर आरोप
दुसऱ्या एका मुद्द्यावर बोलताना रोहित पवार यांनी नाशिकच्या कुंभमेळा नियोजनातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गिरीश महाजन यांच्याकडे अघोषित पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून, सुमारे 30 कोटी रुपयांच्या कामांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. महाजन यांच्या जवळच्या लोकांच्या कंपन्यांना या सर्व कामांची कंत्राटे देण्यात आली असून त्यातून आर्थिक फायदा लाटण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

कंत्राटदारांचे आंदोलन आणि मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
या संपूर्ण कंत्राट प्रकरणाची सत्यता समोर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेले पत्र लवकरच जाहीर करणार असल्याचे पवार म्हणाले. या टेंडर प्रक्रियेत कोणी कोणी सहभाग घेतला आणि प्रत्यक्षात कोणाला कामे दिली गेली, याची सविस्तर माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक मराठी कंत्राटदारांवर अन्याय करून बाहेरच्या गुजराती कंत्राटदारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत, या विरोधात येत्या 18 तारखेला मराठी कंत्राटदार मोठे आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number