Kangana Ranaut Vs Ramdev Baba: ‘माझ्या जवानीची स्वप्नं पाहू नका’ रामदेव बाबांच्या टीकेवर कंगना रणौतचं सडेतोड उत्तर

गेल्या काही महिन्यांपासून भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत आली आहे. अशातच आता कंगना राणावत विरुद्ध रामदेव बाबा हा नवा वाद समोर आला आहे.

Kangana Ranaut Vs Ramdev Baba: ‘माझ्या जवानीची स्वप्नं पाहू नका’ रामदेव बाबांच्या टीकेवर कंगना रणौतचं सडेतोड उत्तर

गेल्या काही महिन्यांपासून भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत आली आहे. अशातच तिने नीट प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतरवर पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. तिने जंतरमंतरवरील आंदोलकांना गटर जनरेशन म्हणून संबोधलं होत. त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकांची झोड उडवली. अशातच आता कंगना रणौत विरुद्ध रामदेव बाबा हा नवा वाद समोर आला आहे.

हेही वाचा- Kalamb Municipal Council : ठाकरे गटाला मोठा धक्का; कळंब नगर परिषदेतील मविआचे 10 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

जेन झी वर केलेल्या वक्तव्यावर रामदेव बाबांनी कंगना राणावतचं शिक्षण आणि तिची पात्रता काढली होती. त्यानंतर आता कंगना रणौतने योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ‘जेन झी’ पिढीबद्दल कंगनाने केलेल्या एका वादग्रस्त विधानावर रामदेव बाबांनी तिची शाळा घेत टीका केली होती, ज्याला उत्तर देताना कंगनाने “माझी जवानी किंवा बेडरूमची स्वप्ने पाहू नका” असे तिखट शब्दांत सुनावले आहे.

कंगना रणौतने पोस्ट करून रामदेव बाबांना खोचक टोला लगावला आहे. यावेळी ती म्हणाली की, “बाबाजी, तुम्ही माझी जवानी वा बेडरूमबाबतची स्वप्ने पाहू नका. कोणीही केवळ अफवा आणि गॉसिपच्या आधारेच अंदाज लावू शकतो. कमीत कमी मला खोट्या किंवा फ्रॉड मेडिकल दाव्यांवर कोर्टाने झापलेलं नाही. हे वास्तवावर आधारीत आहे. गॉसिपवर नाही. त्यामुळे मला कॅरेक्टरचं ज्ञान पाजळू नका. तुमच्या पेक्षा कितीतरी पटीने माझं कॅरेक्टर चांगलं आहे. माझा कोणताही फ्रॉड समोर आलेला नाही, असा हल्लाच कंगनाने चढवला आहे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number