Rahul Gandhi: पुण्यात राहुल गांधींचा ‘जेन-झी’ विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद; म्हणाले, ‘आज राजकारणावर बोलणार नाही…’

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी या मंचावरून कोणतीही राजकीय भाषणबाजी करणार नसल्याचे स्पष्ट करत थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Rahul Gandhi: पुण्यात राहुल गांधींचा ‘जेन-झी’ विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद; म्हणाले, ‘आज राजकारणावर बोलणार नाही…’

Rahul Gandhi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पुण्यात पार पडलेल्या 'छात्रों की गूंज' या छात्र संवादात देशातील महिला आणि युवा शक्तीवर अत्यंत रोखठोक मते मांडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी या मंचावरून कोणतीही राजकीय भाषणबाजी करणार नसल्याचे स्पष्ट करत थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महिला हीच या देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगताना त्यांनी मनस्मृतीच्या विचारांवर तीव्र शब्दात टीका केली. महिलांना नेहमी पुरुषांच्या नियंत्रणाखाली ठेवणे आणि त्यांना स्वतंत्र होऊ न देणे हाच मनस्मृतीचा डाव होता, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला.

आपल्या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी देशाच्या युवा शक्तीवर विशेष भर दिला. भारताची तरुण लोकसंख्या हीच देशाची सर्वात मोठी ताकद आणि भविष्य असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आजच्या नव्या पिढीचे विचार, त्यांच्या मनात असणारे प्रश्न आणि भविष्यातील त्यांच्या आशा-आकांक्षा गांभीर्याने समजून घेणे गरजेचे आहे. राजकीय मंचांवरून होणाऱ्या आरोपांपेक्षा तरुणांचे वास्तव आणि त्यांच्या समस्या ऐकून घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'महिलांवर कोणाचाही अधिकार नाही'; चौकटी मोडण्याचे आवाहन

उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले असले, तरी अजूनही त्यांना एका विशिष्ट चौकटीतच बांधून ठेवले जाते. तुम्ही स्वतःशिवाय इतर कोणालाही बांधिल नाही आहात, कोणत्याही पुरुषाचा महिलांवर अधिकार असू शकत नाही, असे सांगत त्यांनी महिलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे आवाहन केले. देशातील बहुतांश महिलांना अजूनही काम करण्यासाठी पुरुषांची परवानगी घ्यावी लागते आणि समान कामासाठी पुरुषांपेक्षा 25 टक्के पगार कमी मिळतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – ZP School Controversy: लातूरमध्ये शाळेतील कथित स्टंटबाजी पडली महागात; अभिजीत दींपकेंवर गुन्हा दाखल दाखल

स्त्रीभ्रूणहत्या अन् हिंसाचाराच्या आकड्यांवर चिंता

देशातील महिलांच्या सुरक्षेवर बोलताना राहुल गांधी यांनी धक्कादायक आकडेवारी मांडली. देशात दर 100 पैकी 6 महिलांवर अत्याचार होत असून दरवर्षी सुमारे 4.5 लाख स्त्रीभ्रूणहत्या होत असल्याची गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. महिलांना केवळ शारीरिकच नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक हिंसाचारालाही सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची तरुण लोकसंख्या हीच देशाचे खरे भवितव्य असल्याचे नमूद करत, महिलांना योग्य सन्मान आणि समान संधी मिळाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number