Famous Actor Dies: चित्रपटसृष्टीवर शोककळा! शूटिंगदरम्यान समुद्रात बुडून लोकप्रिय अभिनेत्याचा दुर्दैवी अंत

या अपघातामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून त्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Famous Actor Dies: चित्रपटसृष्टीवर शोककळा! शूटिंगदरम्यान समुद्रात बुडून लोकप्रिय अभिनेत्याचा दुर्दैवी अंत

कोलकाता: बंगाली मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचे वयाच्या 43 व्या वर्षी निधन झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, राहुल दिघा येथे ‘भोले बाबा पार करेगा’ या दूरचित्रवाणी मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेला होता. रविवारी तालसरी किनाऱ्याजवळ शूटिंगदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. शूटिंगदरम्यान राहुल पाण्यात उतरला असताना काही क्षणांतच तो पाण्यात बुडाल्याचे समजले.

घटनेनंतर तात्काळ उपस्थित तंत्रज्ञांनी पाण्यात उडी घेत त्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने दिघा येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक अहवालानुसार, पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: IPL 2026 MI vs KKR : पहिल्याच सामन्यात चमकला MI चा लोकल बॉय; घरच्या मैदानावर ठरला मॅन ऑफ द मॅच

या घटनेबाबत मालिकेत राहुल सोबत भूमिका साकारणारे अभिनेता भास्कर बॅनर्जी यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संपूर्ण टीम तालसरी येथे चित्रीकरणासाठी गेली होती. शूटिंग संपल्यानंतर सर्वजण जेवणासाठी गेले असताना राहुल काही शॉट्स पूर्ण करण्यासाठी थांबला होता. “हा अपघात नेमका कसा घडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे,” असे त्यांनी सांगितले.

भास्कर बॅनर्जी यांनी पुढे सांगितले की, राहुल अत्यंत उत्साही आणि तंदुरुस्त अभिनेता होता. त्याच्या अचानक झालेल्या निधनावर विश्वास बसत नाही. “अशी घटना घडेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. हे स्वीकारणे कठीण आहे,” असेही त्यांनी भावनिक शब्दांत म्हटले.

राहुल अरुणोदय बॅनर्जी याच्या निधनाने त्याच्या सहकाऱ्यांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. एका प्रतिभावान आणि उमद्या कलाकाराचा असा अकाली अंत झाल्याने बंगाली मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: IMD Cyclone Alert : IMD चा मोठा इशारा! 60 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणार वारे; देशातील या 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट जारी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number