Chakan MIDC : चाकण औद्योगिक पट्ट्यातील प्रश्नांवर राजकीय खळबळ; शरद पवारांच्या पत्रानंतर 12 तासांत मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

चाकण भागातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या समस्या वास्तववादी असल्याचे मान्य करत, एकही उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणार नाही यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Chakan MIDC : चाकण औद्योगिक पट्ट्यातील प्रश्नांवर राजकीय खळबळ; शरद पवारांच्या पत्रानंतर 12 तासांत मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Chakan MIDC :  पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे सुमारे 20 उद्योगांनी परराज्यात स्थलांतर करण्याचा विचार सुरू केल्याची चर्चा राजकीय आणि औद्योगिक वर्तुळात रंगली होती. या गंभीर मुद्द्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चिंता व्यक्त करत राज्य शासनाला प्रशासकीय स्तरावर 4 महत्त्वाच्या सुधारणा करण्याचे सुचवले होते. या सूचनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या 12 तासांच्या आत पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले. चाकण भागातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या समस्या वास्तववादी असल्याचे मान्य करत, एकही उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणार नाही यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

बंद पडणाऱ्या कंपन्यांचा गैरसमज आणि वस्तुस्थिती
लोकसभेत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रश्नाला मिळालेल्या उत्तरामधून महाराष्ट्रातील 36,211 कंपन्या बंद झाल्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंद म्हणून नोंदवलेल्यांपैकी 76 टक्के कंपन्या या ‘डिफंक्ट’ (कधीही प्रत्यक्ष कामकाज न सुरू झालेल्या) होत्या. याव्यतिरिक्त 12 टक्के कंपन्यांचे अन्य संस्थांमध्ये विलीनीकरण (Amalgamation) झाले, तर अवघ्या 2 टक्के कंपन्यांचे प्रत्यक्ष विसर्जन झाले आहे. उद्योग क्षेत्राची अचूक आकडेवारी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या पोर्टलवर पारदर्शकपणे उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Uddhav Thackeray-Eknath Shinde: ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात मास्टरस्ट्रोक? सिब्बलांनी निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर उपस्थित केले प्रश्न

अल्पकालीन व दीर्घकालीन उपायांचे नियोजन
चाकण परिसरातील समस्या सोडवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत MIDC, PMRDA, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह जिल्हा प्रशासकीय यंत्रणांनी सहभाग घेतला. या माध्यमातून स्थानिक उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडा तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे औद्योगिक क्षेत्रातील अव्वल स्थान
महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक म्हणजेच 3,96,211 सक्रिय कंपन्या कार्यरत आहेत. या यादीत दिल्ली 2,72,342 कंपन्यांसह दुसऱ्या, तर उत्तर प्रदेश 1,85,982 कंपन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. देशात 2015-16 मध्ये सक्रिय कंपन्यांची संख्या 6,78,768 होती, जी आता वाढून 21,17,747 वर पोहोचली आहे. तसेच 2025-26 या वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक 41,525 नवीन उद्योगांची नोंदणी झाली आहे. दरवर्षी सरासरी 20 ते 22 हजार निष्क्रिय कंपन्यांची नोंदणी रद्द (Strike Off) करण्याची नियमित प्रक्रिया राबवली जाते, ज्याचा अर्थ उद्योग बंद पडणे असा होत नाही. त्यामुळे परकीय गुंतवणूक आणि औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्र आजही देशात पहिल्या क्रमांकावरच असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number