गटारांच्या मॅनहोलवरील लोखंडी झाकणं चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईसारख्या शहरात उघड्या मॅनहोल मध्ये पडून अनेक नागरिकांचे अपघात झाले आहेत. अनेकांना आपले जीव देखील गमवावे लागले आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी आता एका असा टोळीला ताब्यात घेतलंय, जे मॅनहोलवरील लोखंडी झाकणं चोरी करत. मुंबई गोरेगाव पूर्व येथील दीड वर्षाचा दिव्यांश सिह नावाचा मुलगा गटारामध्ये पडून बेपत्ता झाला होता. १५ दिवसापासून या मुलाचा शोध घेऊन देखील […]

गटारांच्या मॅनहोलवरील लोखंडी झाकणं चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईसारख्या शहरात उघड्या मॅनहोल मध्ये पडून अनेक नागरिकांचे अपघात झाले आहेत. अनेकांना आपले जीव देखील गमवावे लागले आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी आता एका असा टोळीला ताब्यात घेतलंय, जे मॅनहोलवरील लोखंडी झाकणं चोरी करत.

मुंबई गोरेगाव पूर्व येथील दीड वर्षाचा दिव्यांश सिह नावाचा मुलगा गटारामध्ये पडून बेपत्ता झाला होता. १५ दिवसापासून या मुलाचा शोध घेऊन देखील मुलाचा शोध लागला नाही. त्यानंतर याच गटारावरील झाकण अज्ञात व्यक्तीने काढल्याचे समोर आलं होतं.

असाच प्रकार आता जोगेश्वरी पूर्व विभागात देखील घडला. रस्त्यातील ड्रेनेज लाइनच्या मॅनहॉलवरील लोखंडी झाकण चोरी करत असल्याचे लक्षात आल्यावर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याविषयी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना दोन व्यक्ती गटाराचे झाकण चोरी करत असल्याचा संशय पोलिसांना आल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता दोन व्यक्ती संशयितरीत्या आढळून आले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत लोखंडी झाकण चोरल्याचं कबूल केल्यावर दोघांना अटक करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number