Navneet Rana: ‘गोळ्या झेलणार मात्र कुराण वाचणार नाही, असं मला माझा मुलगा म्हणतो’

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय नेते पाकिस्तान विरोधात वेगवेगळी वक्तव्य करताना दिसत आहेत. गोळ्या झेलणार मात्र कुराण वाचणार नाही असं मुलगा म्हणतो असे विधान भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी केले आहे.

Navneet Rana: ‘गोळ्या झेलणार मात्र कुराण वाचणार नाही, असं मला माझा मुलगा म्हणतो’

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय नेते पाकिस्तान विरोधात वेगवेगळी वक्तव्य करताना दिसत आहेत. गोळ्या झेलणार मात्र कुराण वाचणार नाही असं मुलगा म्हणतो असे विधान भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी केले आहे. नवनीत राणा कायमच हिंदुत्ववादावर भाष्य करत असतात. आता जम्मू काश्मीरातील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर पाकड्यांविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून दिल्या जात आहेत. 

माझा मुलगा म्हणतो, गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही असे वक्तव्य माजी खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. जे हिंदुस्थानासोबत इमानदार राहू शकत नाही. त्यांना इथे राहायचा अधिकार नाही असेही राणा म्हणाल्या आहेत. 

हेही वाचा : औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या मुलाचे उदाहरण दिले आहे. त्या म्हणाल्या, माझा मुलगा म्हणतो मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही, असे तो म्हणाला.  पंतप्रधान मोदी हे भुट्टो सारख्याला भुट्ट्यासारखे भाजतील, मला मोदी, अमित शहा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे असेही राणा यांनी म्हटले आहे. 

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. जम्मू काश्मीरातील पहलगामध्ये येथे नागरिक पर्यटनसाठी गेले होते. त्यांच्यावर धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. त्यांना पहलगाममधून विमानाने महाराष्ट्रात आणले गेले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. राज्य सरकारने हल्ल्यात मृत झालेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांना अर्थसहाय्य देखील केले. तसेच हल्ल्यानंतर जे लोक जम्मू काश्मीरमध्ये होते. त्यांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था करण्यात आली. विशेष विमानी व्यवस्था करत त्यांना परत आणले गेले. केंद्र सरकार जम्मू काश्मीरात झालेल्या हल्ल्यानंतर अॅक्शन मोडवर आले आहे. दहशतवाद्यांवर कारवाया करण्यात येत आहेत. त्यांची घर देखील पाडण्यात येत आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number