महानगरपालिका निवडणूक आरक्षण सोडत जाहीर

राज्यातील १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात आरक्षित वॉर्डांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वॉर्डासह आज मुंबई महापालिकेच्या २३६ वॉर्डाचे ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत काढण्यात आली. या वॉर्ड आरक्षणानंतर मुंबई मनपातील अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. तर काहींचे वॉर्ड हे […]

महानगरपालिका निवडणूक आरक्षण सोडत जाहीर

राज्यातील १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात आरक्षित वॉर्डांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वॉर्डासह आज मुंबई महापालिकेच्या २३६ वॉर्डाचे ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत काढण्यात आली. या वॉर्ड आरक्षणानंतर मुंबई मनपातील अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. तर काहींचे वॉर्ड हे सुरक्षित राहिले आहेत. अनुसूचित जाती आणि महिला आरक्षणामुळे वर्षानुवर्षे निवडून येत असलेल्या नगरसेवकांना आपले वॉर्ड गमवावे लागले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, शिवसेना नगरसेवक अमेय घोले, काँग्रेस नेते आणि पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आणि बेस्टचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते आशिष चेंबूरकर यांना यंदा आपला वॉर्ड सोडावा लागणार आहे. अमेय घोले, रवी राजा आणि प्रभाकर शिंदे यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड अनुसूचित वर्गासाठी आरक्षित झाला आहे. याशिवाय, मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव -वॉर्ड क्रमांक ११७ हा देखील महिलांसाठी आरक्षित झाला आहे.

पालिकेकडून आरक्षित आणि अनारक्षित वॉर्डांची जाहीर केलेली यादी

प्रभाग क्रमांक २७.५५ ९५, ९८, १११. १२१, १२४, १२६, १२९, १३७, १४५, १४६, १४७,१५०, १५१,१५२, १५४, १५५ १५६, १५९. १६०, १७५, १७९, १८७, १८९, १९२, १९५, २०२, २०३, २०६, २०७, २१८, २२४ व २३४ हे सन २००७, २०१२ व २०१७ च्या निवडणूकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते त्यांना आता वगळण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ६०, ८५, १०७, ११९.१३९, १५३, १५७, १६२, १६५, १९०, १९४, २०४, २०८, २१५ व २२१ हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत. या प्रभागांपैकी सन २००७, २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी कोणताही प्रभाग आरक्षित नसल्याने नमूद १५ प्रभागांतून ८ प्रभाग स्त्रियांसाठी सोडतीद्वारे निवडण्यात येतील. ओबीसी आरक्षण वगळून महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी ही सोडत होती.

अनुसूचित जाती महिला प्रवर्ग आरक्षण- प्रभाग क्र. १३९, १९०, १९४, १६५, १०७, ८५, ११९, २०४


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number