गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! यंदा ‘लालबागच्या राजा’ची प्रतिष्ठापना होणार!

मुंबई: कोरोनाचे नियम पाळून ‘लालबागच्या राजा’ची प्रतिष्ठापना होणार असून राज्य सरकारनं गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यंदा लालबागमध्ये गणेशोत्सव साजरा होणार आहे. लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यंदा साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं असून, दर्शनासाठी […]

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! यंदा ‘लालबागच्या राजा’ची प्रतिष्ठापना होणार!

मुंबई: कोरोनाचे नियम पाळून ‘लालबागच्या राजा’ची प्रतिष्ठापना होणार असून राज्य सरकारनं गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यंदा लालबागमध्ये गणेशोत्सव साजरा होणार आहे. लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे.

कोरोनामुळे गेल्यावर्षी लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यंदा साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं असून, दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचीही सूचना करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर लालबागचा राजा गणेश मंडळाने गणेशभक्तासाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सव साजरा करण्याबाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना:-

  • गणेशोत्सवासाठी महामंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक
  • कोरोनामुळे महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपातच मंडप उभारण्यात यावा. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणं अपेक्षित असल्यानं भपकेबाज सजावट करणं टाळावं.
  • सार्वजनिक गणेश मंडळातील मूर्तीची उंची ४ फूट आणि घरातील मूर्तीची उंची २ फुटांपेक्षा जास्त उंच नसावी.
  • शक्यतो गणेशमूर्तीऐवजी धातूच्या वा संगमरवरी मूर्तीचं पूजन करावं. शक्यतोवर घरच्या घरी मूर्तीचं विसर्जन करावं. ते शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्ती विसर्जित करावी.
  • स्वच्छेने दिलेल्या देणग्याच स्विकाराव्यात. जाहिरातींमुळे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती करण्याला प्राधान्यक्रम द्यावा.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम वा शिबिरे घेण्याला प्राधान्य देण्यात यावं. स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.
  • राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध गणेशोत्सवातही कायम असतील. शिथिल केले जाणार नाहीत.
  • आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्यात यावे.
  • नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्किंग, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.
  • गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
  • आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नये. विसर्जन स्थळी करण्यात येणारी आरती घरीच करावी. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाणं टाळावं. चाळीतील आणि इमारतीतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये.
  • महापालिका, विविध मंडळं, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
  • कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारसह, आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन यांनी ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करण्यात यावं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number