वक्फ कायद्याच्या निषेधार्थ लाईनमनने संपूर्ण गावाची बत्ती केली गुल! मग काय.. नोकरीही गुल

वीज गेल्यानंतर ज्यांच्या घरात इन्व्हर्टर होते, त्यांनी ते चालू केले. यानंतर मुस्लीम समुदायाच्या लोकांनी गावकऱ्यांच्या इन्व्हर्टर वापरण्याला विरोध केल्याचा आरोप आहे. यामुळे वादावादी आणि गोंधळही झाला.

वक्फ कायद्याच्या निषेधार्थ लाईनमनने संपूर्ण गावाची बत्ती केली गुल! मग काय.. नोकरीही गुल

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका कंत्राटी वीज कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले. नवीन वक्फ कायद्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या अपीलानंतर त्याने संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचले. याबाबत कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ही घटना 30 एप्रिल रोजी घडली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. वक्फ कायद्याचे उल्लंघन करून घरे आणि दुकानांचे दिवे 15 मिनिटांसाठी बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. ही वेळ रात्री 9 ते 9:15 अशी निश्चित करण्यात आली होती.

हेही वाचा – झारखंडमधील 12 गावांमधील महिला आई का होऊ शकत नाहीयेत? रेडिएशनमुळे प्रजनन संस्था प्रभावित?

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही त्याचे समर्थन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या घराचे दिवे बंद करून निषेध नोंदवला. याचा एक व्हिडिओ तयार करून.त्यांनी एक्सवर पोस्ट केला होता.

उत्तर प्रदेशातील मेरठ येथेही अशाच प्रकारचा निषेध करण्यात आला. मुंडली येथील अजरदा गावातील वीज केंद्रातील कंत्राटी लाईनमन रियाजुद्दीनने रात्री 9 ते 9:15 च्या दरम्यान संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप आहे. अचानक वीज का गेली, हे गावकऱ्यांना समजले नाही. रात्री 9 वाजता संपूर्ण गाव अंधारात होते.

जेव्हा वीज गेली, तेव्हा ज्यांच्या घरात इन्व्हर्टर होते त्यांनी ते चालू केले. यानंतर मुस्लीम समुदायाच्या लोकांनी गावकऱ्यांच्या इन्व्हर्टर वापराला विरोध केल्याचा आरोपही आहे. वाद झाला आणि गोंधळही झाला. पोलिसांनाही कळवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री सोमेंद्र तोमर यांची भेट घेतली आणि लाईनमन रियाजुद्दीनविरुद्ध तक्रार केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऊर्जामंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर, मेरठ परिसरातील वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. प्राथमिक तपासाचा हवाला देत, कंत्राटी कामगार रियाजुद्दीनने जाणूनबुजून गावाचा वीजपुरवठा खंडित केल्याचा दावा करण्यात आला. यानंतर, विभागाने रियाजुद्दीनला तात्काळ प्रभावाने बडतर्फ केले.

हेही वाचा – पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरमध्येच; त्यांना कोणीतरी अन्न, इतर साहित्य पुरवतेय : सूत्र

स्थानिक वृत्तानुसार, वीज विभागाचे मुख्य अभियंता संजीव कुमार यांनी या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, "हापूर येथील अजरदा पॉवर सेंटरमध्ये तैनात वीज कंत्राटी कामगार रियाजुद्दीन यांनी वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी कोणतीही तक्रार नसताना 30 तारखेच्या रात्री 9:00 ते 9:15 वाजेपर्यंत अजरदा पॉवर सबस्टेशन बंद केले. यामुळे संपूर्ण गावात अंधार झाला आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणावर कारवाई करत रियाजुद्दीनची सेवा रद्द करण्यात आली आहे."

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा प्रभाव अनेक राज्यांमध्ये दिसून आला. जमशेदपूरमधूनही असेच एक चित्र समोर आले. लोकांनी घरातील दिवे बंद करून निषेध नोंदवला. याशिवाय, नागपूरच्या काही भागातही असेच निषेध नोंदवण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number