Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंचा आंदोलनाचा प्लॅन B समोर; मुंबईऐवजी आता ‘या’ ठिकाणाहून फुंकणार उपोषणाचं रणशिंग

प्रकृतीच्या कारणास्तव मध्यंतरी स्थगित केलेला मराठवाडा दौरा आटोपता घेत त्यांनी नव्या आंदोलनाची हाक दिली आहे.

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंचा आंदोलनाचा प्लॅन B समोर; मुंबईऐवजी आता ‘या’ ठिकाणाहून फुंकणार उपोषणाचं रणशिंग

Manoj Jarange Strike : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात आवाज उठवणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मध्यंतरी स्थगित केलेला मराठवाडा दौरा आटोपता घेत त्यांनी नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. यापूर्वी घोषित केल्यानुसार 29 ऑगस्टपासून मुंबईत होणारे बेमुदत उपोषण आता मुंबईऐवजी आंदोलनाचे केंद्रस्थान असलेल्या जालन्यातील अंतरवाली सराटी येथेच होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. मात्र, शासनाने मागण्यांसंदर्भात तातडीने योग्य पावले उचलली नाहीत, तर उपोषण सुरू असतानाच मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करेल, असा स्पष्ट अन् निर्वाणीचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

कुणबी दाखले रद्द केल्याने संताप; सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला

शासकीय पातळीवर मराठा समाजाच्या काही नागरिकांचे कुणबी जात प्रमाणपत्र अचानक रद्द करण्यात आल्याच्या प्रकारामुळे मनोज जरांगे प्रचंड संतप्त झाले आहेत. या निर्णयाचा थेट निषेध नोंदवत त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धोरणांमुळेच समाजावर पुन्हा उपोषणाची वेळ ओढवली असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. राज्यकर्ते जाणीवपूर्वक आरक्षणाचा प्रश्न चिघळवत असून, रद्द केलेले कुणबी दाखले पुन्हा पूर्ववत होत नाहीत आणि दिलेल्या शब्दाचे पालन केले जात नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा – Amol Kolhe : 'अधिकारी प्रोटोकॉल पाळणार नसतील, तर…'; अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून थेट इशारा

संजय शिरसाट आणि बावनकुळेंवर गंभीर आरोप; आंदोलनाचा नवा प्लॅन

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी काही मंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आधीच आरोप केल्यानंतर, आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर त्यांनी गंभीर ठपका ठेवला आहे. शिरसाट हे जाणीवपूर्वक कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात पुढाकार घेत असून त्यांचा हा आडमुठेपणा थेट एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी ठरेल, असे ते म्हणाले. वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरूनच या घडामोडी घडत असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या मिलीभगतीवर ताशेरे ओढले. मुंबईतील आंदोलनासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर निवेदने आधीच सादर केली असून, आता अंतरवाली सराटीतूनच या निर्णायक लढ्याला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number