Maratha Andolan : जरांगेंचा मुंबई आंदोलनाचा प्लॅन ठरला; चार मुक्काम, पाचव्या दिवशी आझाद मैदान, वाचा आंदोलनाची संपूर्ण रुपरेषा

विजय चिडे, प्रतिनिधी  अंतरवाली – सराटी, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे. अंतरवाली सराटी येथून 15 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मुंबईच्या दिशेने कूच करण्यात येणार आहे. तर 19 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. उपोषणाच्या पंधराव्या दिवशी जरांगे पाटील यांनी मराठा […]

Maratha Andolan : जरांगेंचा मुंबई आंदोलनाचा प्लॅन ठरला; चार मुक्काम, पाचव्या दिवशी आझाद मैदान, वाचा आंदोलनाची संपूर्ण रुपरेषा

विजय चिडे, प्रतिनिधी 

अंतरवाली – सराटी, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे. अंतरवाली सराटी येथून 15 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मुंबईच्या दिशेने कूच करण्यात येणार आहे. तर 19 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. उपोषणाच्या पंधराव्या दिवशी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुंबई आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मुंबईला जाण्याची तयारी करा, असं सांगताना जरांगे पाटील भावूक झाले. विशेष म्हणजे अंतरवाली ते मुंबई या प्रवासाची संपूर्ण रूपरेषाही त्यांनी जाहीर केली आहे.

असा असेल जरांगेंचा मुंबईकडे जाणारा मोर्चा –

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतलंय. 15 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने मोर्चाला सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणाची ही शेवटची लढाई असल्याचे सांगत महाराष्ट्रातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने मुंबईत सहभागी व्हावे, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

हेही वाचा : BJP Leader Death : थरारक घटना! दिवसाढवळ्या भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, वर्गणीच्या वादातून खून झाल्याचा संशय; पोलिसांचा तपास सुरू

चार मुक्काम, पाचव्या दिवशी मुंबई – 

अंतरवाली सराटी ते मुंबई असा हा प्रवास असणार आहे

मोर्चाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबरला पाटोदा येथे मुक्काम असेल

तर 16 सप्टेंबरला श्रीगोंदा येथे मुक्काम केला जाईल

तसेच 17 सप्टेंबर रोजी पुण्यातील हडपसर येथे मुक्काम होणार आहे

तर 18 सप्टेंबरला खोपोली येथे मुक्काम केला जाणार आहे

पाचव्या दिवशी म्हणजेच 19 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता मोर्चा थेट मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल होणार आहे

थोडक्यात मुंबईचा प्रवास – 

15 सप्टेंबर – अंतरवाली सराटी ते पाटोदा
16 सप्टेंबर – पाटोदा ते श्रीगोंदा
17 सप्टेंबर – श्रीगोंदा ते हडपसर
18 सप्टेंबर – हडपसर ते खोपोली
19 सप्टेंबर – खोपोली ते आझाद मैदान, मुंबई

शांततेचं आवाहन

दरम्यान, मुंबईचा हा मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात येईल, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दगडफेक, जाळपोळ किंवा धिंगाणा करायचा नाही. कुणी उचकावलं तरी संयम सोडायचा नाही, असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं आहे. अडवण्याचा प्रयत्न झाल्यास बॅरिकेडला हात न लावता त्याच ठिकाणी शांततेत बसण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

हेही वाचा : Crime : हॉटेलमध्ये गेली अन् तो आला; 40 मिनिटांनी घडलेल्या प्रकाराने प्रत्येकजण हादरला; रुम नंबर 101 मध्ये ब्युटीशियनसोबत घडलं काय?

सरकारला थेट इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारला जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला आहे. मराठा समाजाला अडवू नका…, आमचा रोष अंगावर घेऊ नका, असं ते म्हणाले. हैदराबाद गॅझेटियर, सातारा-कोल्हापूर-औंध गॅझेटियर आणि मराठा-कुणबी प्रमाणपत्रांचा प्रश्न मुंबईत जाऊन मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारने अंतरवालीतूनच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. अन्यथा मुंबईला जाण्याचा निर्णय कायम असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

महिलांनाही मुंबईत येण्याचं आवाहन

या आंदोलनात मराठा महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नींकडे मराठा महिलांनी हळदी-कुंकू घेऊन आरक्षणाची मागणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, जालना जिल्हाधिकारी आणि मंत्री छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यांवरही जरांगे पाटील यांनी टीका केली. अंतरवाली सराटीपासून सुरू होणारा हा मोर्चा शांततेच्या मार्गाने मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत नेण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सरकारने मागण्या मार्गी लावल्या नाहीत, तर 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार, अशी स्पष्ट भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली. आता सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेतं आणि 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या मुंबई प्रवासाला प्रशासन कसं सामोरं जातं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number