BJP New IT Cell Head : भाजपचा मोठा फेरबदल! अमित मालवीय यांची गच्छंती; ‘या’ नेत्याकडे सोपवली IT सेलची धुरा

भारतीय जनता पक्षाने आपल्या राष्ट्रीय संघटन आणि कार्यकारिणीत मोठे धोरणात्मक बदल जाहीर केले आहेत.

BJP New IT Cell Head : भाजपचा मोठा फेरबदल! अमित मालवीय यांची गच्छंती; ‘या’ नेत्याकडे सोपवली IT सेलची धुरा

BJP New IT Cell Head:  भारतीय जनता पक्षाने आपल्या राष्ट्रीय संघटन आणि कार्यकारिणीत मोठे धोरणात्मक बदल जाहीर केले आहेत. पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय सरचिटणीस नितीन नबीन यांनी या नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. या बदलांमध्ये सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या डिजिटल प्रचाराचे प्रमुख असलेले अमित मालवीय यांच्याकडील जबाबदारी काढून ती दीपक म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे भाजपच्या सोशल मीडिया रणनीतीत नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे.

प्राध्यापक ते डिजिटल प्रमुख असा प्रवास

दीपक म्हस्के हे मूळचे छत्तीसगड राज्यातील असून, ते रसायनशास्त्राचे (Chemistry) प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले आहेत. शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त त्यांनी कृषी, फलोत्पादन तसेच निवडणूक डेटा विश्लेषण (Election Data Analytics) क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. यापूर्वी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून जबाबदारी पार पाडली असून, नुकतीच त्यांची छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेज कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये संचालक आणि प्रशासकीय पदांवर काम केल्याचा दीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.

अमित मालवीय यांच्या 11 वर्षांच्या कारकिर्दीचा सांगता

अमित मालवीय हे 2015 पासून म्हणजे तब्बल 11 वर्षे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. सोशल मीडियावर पक्षाची आक्रमक भूमिका मांडण्यात आणि विरोधकांवर जोरदार डिजिटल प्रतिहल्ला चढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. नव्या टीमचे स्वागत करताना मालवीय यांनी स्वतः दीपक म्हस्के यांच्याकडे जबाबदारी सोपवली जात असल्याचे स्पष्ट केले. गेल्या 11 वर्षांतील आठवणींना उजाळा देत त्यांनी नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – Vijay Chaudhari: 'ती' ऑडिओ क्लिप भोवली; भाजप नेते विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची नवी रणनीती

उत्तर प्रदेशसह देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ही मोठी फेररचना केल्याचे मानले जात आहे. नव्या सोशल मीडिया टीममध्ये दीपक म्हस्के यांच्यासोबत प्रीती गांधी, शिवानंद द्विवेदी, आलोक भट्ट आणि अरुण यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, मीडिया विभागाची धुरा अनिल बलुनी यांच्याकडे कायम ठेवण्यात आली असून, त्यांच्या सहकार्यासाठी आशिष उषा अग्रवाल, प्रदीप भंडारी आणि सिद्धार्थ यादव यांची नियुक्ती झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number