Maharashtra Transport Strike: वाहतूकदारांचा सरकारला इशारा; मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर अनिश्चितकालीन संप

ई-चलन प्रणालीतील त्रुटी आणि वाढत्या दंडाच्या विरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.

Maharashtra Transport Strike: वाहतूकदारांचा सरकारला इशारा; मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर अनिश्चितकालीन संप

ई-चलन प्रणालीतील त्रुटी आणि वाढत्या आर्थिक दबावाच्या निषेधार्थ महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने आजपासून राज्यभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला ‘जनआंदोलन’ असे नाव देण्यात आले असून राज्यातील ट्रक, टेम्पो, खासगी बसेस आणि टॅक्सी चालक- मालक संघटनांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनाचे मुख्य केंद्र मुंबईतील आझाद मैदान आहे. येथे सुमारे एक लाखांहून अधिक वाहने एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील विविध भागांतून ट्रान्सपोर्टर्स मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होत असून या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रान्सपोर्टर्सच्या विविध मागण्यांवर राज्य सरकार आणि संघटनांच्या नेत्यांमध्ये यापूर्वी चर्चा झाली होती. मात्र या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. विशेषतः ई-चलनमध्ये 50 टक्के आगाऊ दंड भरण्याच्या निर्णयाला ट्रान्सपोर्टर्सनी तीव्र विरोध दर्शवला आहे. शासनाने या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आज मध्यरात्रीपासून राज्यभर अनिश्चितकालीन संप सुरू करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये तसेच विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयांबाहेर (आरटीओ) निदर्शने, रास्ता रोको आणि ‘चक्का जाम’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सपोर्टर्स रस्त्यावर उतरल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होताना दिसत आहे.

वाहतूक संघटनांचा आरोप आहे की, ई-चलनमधील दंडाची रक्कम ही मनमानी आणि अतार्किक आहे. काही प्रकरणांमध्ये दंडाची रक्कम ही संबंधित वाहनाच्या किंमतीपेक्षाही जास्त असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकारने या प्रणालीमध्ये तातडीने सुधारणा कराव्यात, अशी मागणी ट्रान्सपोर्टर्सकडून करण्यात येत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number