State Election Commission: महायुतीचे बिनविरोध उमेदवार अडचणीत? आयोगाकडून सखोल चौकशीचे आदेश

महाराष्ट्रातील काही महानगरपालिकांमधील बिनविरोध निवडी संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत.

State Election Commission: महायुतीचे बिनविरोध उमेदवार अडचणीत? आयोगाकडून सखोल चौकशीचे आदेश

महाराष्ट्रातील काही महानगरपालिकांमध्ये झालेल्या बिनविरोध निवडी सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहेत. या निवडी प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झाला का, याबाबत शंका उपस्थित झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाकडून संबंधित ठिकाणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नामांकन अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला का, किंवा आमिष दाखवण्यात आले का, याचा तपास या चौकशीमध्ये केला जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी, तसेच लोकशाही मूल्यांना तडा जाऊ नये, यासाठी ही चौकशी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. चौकशीदरम्यान उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक यंत्रणेशी संबंधित व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच राज्य निवडणूक आयोगाकडून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांमध्ये सध्या प्रतीक्षेचे वातावरण आहे.

दरम्यान, राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीचे एकूण ६८ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे. यामध्ये भाजपचे सर्वाधिक ४४, शिंदे गटाचे २२, तर अजित पवार गटाचे २ उमेदवार समाविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाचा निर्णय आणि चौकशीचा निष्कर्ष काय येतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number