PM Modi on Lockdown : कोरोनासारख्या संकटांना पुन्हा सामोरे जाण्याची शक्यता, पंतप्रधान मोदींकडून लॉकडाऊनचे संकेत?

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे भारतासह अनेक देशांचे महत्त्वाचे सागरी मार्ग आणि ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सायबरविश्वात ‘लॉकडाऊन’च्या आठवणींनी वातावरण गजबजले होते. कारण लोक ‘भारतात पुन्हा लॉकडाऊन’ आणि ‘लॉकडाऊनच्या बातम्या’ यांसारख्या चर्चा करत होते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठकीची घोषणा केल्याने या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले. लोकं ‘भारतात पुन्हा लॉकडाऊन येणार […]

PM Modi on Lockdown : कोरोनासारख्या संकटांना पुन्हा सामोरे जाण्याची शक्यता, पंतप्रधान मोदींकडून लॉकडाऊनचे संकेत?

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे भारतासह अनेक देशांचे महत्त्वाचे सागरी मार्ग आणि ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सायबरविश्वात ‘लॉकडाऊन’च्या आठवणींनी वातावरण गजबजले होते. कारण लोक ‘भारतात पुन्हा लॉकडाऊन’ आणि ‘लॉकडाऊनच्या बातम्या’ यांसारख्या चर्चा करत होते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठकीची घोषणा केल्याने या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले. लोकं ‘भारतात पुन्हा लॉकडाऊन येणार आहे का?’ आणि ‘ऊर्जा लॉकडाऊन म्हणजे काय?’ यांसारखे प्रश्न ऑनलाइन शोधू लागले.

हेही वाचा : Trump Iran Peace Plan: ट्रम्प यांची इराणसाठी ’15-कलमी’ युद्धविराम योजना; इस्रायलला धक्का, तर तेहरानच्या ‘या’ अटींनी वाढला पेच

हैदराबादसारख्या शहरांमध्ये, लोक आपल्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी रांगा लावताना दिसले. हे सर्व अशा वेळी घडत होते. जेव्हा पश्चिम आशियातील संघर्ष चौथ्या आठवड्यात पोहोचला होता. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापारी मार्ग विस्कळीत झाले होते.

पश्चिम आशिया संघर्षावर सोमवारी आणि मंगळवारी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या भाषणांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने कोविड-19 महामारी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययांचा सामना कसा केला, याची आठवण करून दिली. “पूर्वीही आमच्या सरकारने जागतिक संकटांचे ओझे शेतकऱ्यांवर पडू दिले नाही,” असे मोदी सोमवारी पश्चिम आशिया संकटावर लोकसभेत केलेल्या भाषणात म्हणाले. मंगळवारी, राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी आदल्या दिवशी लोकसभेत जे म्हटले होते, त्याचीच जवळपास पुनरावृत्ती केली. मोदींनी देशाला आवाहन केले की, “ज्याप्रमाणे आपण कोविड-19 महामारीच्या काळात एकजूट राहिलो होतो. त्याचप्रमाणे तयार आणि एकजूट राहा”, अने म्हटले. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number