Kangana Ranaut: ‘जनरेशन गटर’च्या वादग्रस्त वक्तव्यावर कंगनाचं पुन्हा खळबळजनक स्पष्टीकरण ‘झुरळांची पैदास तर गटारातच..’

आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना कंगनाने अत्यंत टोकाची भाषा वापरत टीकाकारांवर पलटवार केला. 'जर एखादी व्यक्ती स्वतःची तुलना झुरळाशी करत असेल, तर...'

Kangana Ranaut: ‘जनरेशन गटर’च्या वादग्रस्त वक्तव्यावर कंगनाचं पुन्हा खळबळजनक स्पष्टीकरण ‘झुरळांची पैदास तर गटारातच..’

Kangana Ranaut Generation Gutter Remark Row: दिल्लीतील जंतरमंतर येथे जून ते 25 जुलै या कालावधीत कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन पार पडले होते. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन चालवण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अतिशय हिणकस आणि अश्लाघ्य भाषा वापरली होती. यावरून भाजप खासदार व अभिनेत्री कंगना रणौत हिने आंदोलकांना ‘गटरछाप’ आणि ‘जनरेशन गटर’ असे संबोधले होते. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर चहुबाजूंनी प्रचंड टीका झाली, ज्यावर आता तिने अत्यंत आक्रमकपणे स्वतःची बाजू मांडली आहे.

‘सगळ्या तरुणांना नाही, तर स्वतःला झुरळ म्हणवणाऱ्यांनाच बोलले!’
आपल्या वादग्रस्त विधानाचा पुनरुच्चार करताना कंगना रणौतने स्पष्ट केले की, तिने हे वक्तव्य देशातील सर्व तरुण-तरुणींना किंवा संपूर्ण पिढीला उद्देशून केलेले नाही. ‘मी माझ्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्टपणे ‘सम पीपल’ (काही लोक) आणि ‘सम विमेन’ (काही महिला) असा उल्लेख केला होता,’ असे सांगत कंगनाने आपल्या वक्तव्याचा बचाव केला. जे लोक स्वतःच्या आंदोलनाला आणि स्वतःला ‘कॉकरोच’ (झुरळ) म्हणवून घेतात, त्यांनाच मी उत्तर दिले आहे, असे स्पष्टीकरण तिने दिले.

हेही वाचा – Abhijeet Dipke : ‘हे जंतर-मंतर नाही, इथे ही नौटंकी चालणार नाही’; पार्कमधील बैठकीवरून तुफान राडा; दीपकेंना रहिवाशांनी हाकलले

‘झुरळांची पैदास गटारातच होते, मग राग कशाला?’
आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना कंगनाने अत्यंत टोकाची भाषा वापरत टीकाकारांवर पलटवार केला. ‘जर एखादी व्यक्ती स्वतःची तुलना झुरळाशी करत असेल, तर सर्वांनाच माहीत आहे की झुरळांची पैदास ही गटारातच होते. त्यामुळे स्वतःला झुरळ म्हणवून घेणाऱ्यांची मानसिकता ही गटारातलीच असणार, त्यात मी काही चुकीचे बोलले काय?’ असा थेट सवाल तिने उपस्थित केला. जे स्वतःला झुरळ मानत नाहीत, त्यांनी स्वतःवर ही टीका ओढवून घेण्याचे आणि दुःखी होण्याचे काहीही कारण नाही, असेही ती म्हणाली.

कंगनाची ‘ती’ मूळ टीका ज्यामुळे राजकीय वातावरण तापले
कंगनाने यापूर्वी केलेल्या मूळ वक्तव्यात आंदोलकांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. भारत हा अत्यंत शालीन, सांस्कृतिक आणि प्रगल्भ लोकांचा देश असल्याचे सांगत ती म्हणाली होती की, ‘हे आंदोलक स्वतःला झुरळ म्हणतात आणि त्यांचे वर्तन व रूपही तसेच किळसवाणे आहे. हे लोक जगासमोर फक्त कुरुपपणा आणि घाण दाखवत आहेत.’ या आंदोलकांना ‘जनरेशन गटर’ म्हणत, या तरुणांकडे व्यवस्थेला देण्यासाठी काहीही सकारात्मक नाही, त्या अभ्यासात चांगल्या नाहीत आणि इतक्या भ्रष्ट आहेत की त्या गृहिणीसुद्धा होऊ शकत नाहीत, अशी घणाघाती टीका तिने केली होती.

हेही वाचा – Jantar Mantar Season 2 : ‘जंतर-मंतर सीझन 2 लवकरच…’; अभिजीत दीपके यांची मोठी घोषणा; CJP पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number