Maratha Reservation : राज्य सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना नोकरी मिळणार..

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना सामाजिक आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Maratha Reservation : राज्य सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना नोकरी मिळणार..

Manoj Jarange 10th Day Hunger Strike: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना सामाजिक आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने (GAD) जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मृत आंदोलकांच्या कुटुंबातील एका पात्र सदस्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत झालेल्या प्राथमिक पडताळणीनंतर पात्र वारसांची यादी तयार करण्यात आली आहे. बीड जिल्हा प्रशासनाने या वारसांच्या सर्व कागदपत्रांची छाननी पूर्ण केली असून, त्यांना नियुक्ती पत्र देण्यासाठी आवश्यक असलेली पुढील कायदेशीर प्रक्रिया आता वेगाने राबवली जात आहे.

जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 10 वा दिवस; प्रकृती चिंताजनक
दुसरीकडे, कुणबी नोंदी असलेल्या सर्व मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 10 वा दिवस असून, पोटात अन्न आणि पाण्याचा एक कणही नसल्याने त्यांची प्रकृती कमालीची खालवली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली असून, आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना पुनर्वसन म्हणून नोकरी देण्याची मागणीही त्यांच्या अजेंड्यावर होती.

हेही वाचा – Gopichand Padalkar : एकीकडे मराठ्यांचं भगवं वादळ, दुसरीकडे धनगर समाजाचा एल्गार! महाराष्ट्रातील राजकारण तापलं; सरकारची भूमिका काय?

कुणबी प्रमाणपत्राबाबत उपसमितीची तातडीची बैठक
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र वितरीत करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीस मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. मराठवाड्यातील सर्व उपविभागीय अधिकारी (SDO), तहसीलदार आणि गटविकास अधिकारी (BDO) व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला जोडले गेले होते. प्रमाणपत्र वितरणातील अडचणी दूर करून ही प्रक्रिया सुलभ आणि गतिमान करण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी लातूरमध्ये 'रास्ता रोको'
मनोज जरांगे पाटील यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाले असून राज्यभरात निदर्शने सुरू झाली आहेत. लातूर जिल्ह्यातील बोरगाव काळे येथे आंदोलकांनी लातूर ते बार्शी महामार्गावर उतरून तीव्र 'रास्ता रोको' आंदोलन केले, ज्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. बोरगाव काळे येथे एका मराठा आंदोलकाचे गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू असून, त्याला पाठिंबा देण्यासाठी स्थानिकांनी महामार्ग रोखून धरला आहे.

हेही वाचा – Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; मराठा समाजासाठी काढले 4 महत्त्वाचे शासन निर्णय!

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number