Crime News: पोटच्या मुलीचाच दिला बळी! अंधश्रद्धेचा भयानक प्रकार; मुलाच्या रक्षणासाठी आईनेच तांत्रिकासोबत रचला जीवे मारण्याचा कट

घटनेनंतर सुरुवातीला मुलीच्या आईने अपहरणाचा आरोप केला होता. 25 मार्च 2026 रोजी गावाजवळील शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला.

Crime News: पोटच्या मुलीचाच दिला बळी! अंधश्रद्धेचा भयानक प्रकार; मुलाच्या रक्षणासाठी आईनेच तांत्रिकासोबत रचला जीवे मारण्याचा कट

झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका तरुण मुलीची गळा आवळून हत्या करून कथित अघोरी विधी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या आईसह तिघांना अटक केली आहे.

हजारीबागचे पोलीस अधीक्षक अंजनी अंजन आणि डीआयजी अंजनी झा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पोलिसांनी 35 वर्षीय रेश्मी देवी (मुलीची आई), 55 वर्षीय शांती देवी (तांत्रिक) आणि 40 वर्षीय भीम राम या तिघांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी कुशुंभा गावातील रहिवासी आहेत.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रेश्मी देवीने तिच्या आजारी मुलाच्या उपचारासाठी गावातील तांत्रिकाकडे वारंवार जात होती. त्या तांत्रिकाने मुलाचा आजार बरा करण्यासाठी ‘कुमारी मुलीचे बलिदान’ देण्याचा सल्ला दिला होता. यानंतर या अमानुष कृत्याची योजना आखण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Lok Sabha : लोकसभेने मंजूर केले जनविश्वास दुरुस्ती विधेयक

24 मार्च 2026 रोजी अष्टमीच्या रात्री, गावात रामनवमीच्या जुलूसाचा उत्साह सुरू असताना, आरोपींनी शांती देवीच्या घरातच या मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर विधीच्या नावाखाली अत्यंत क्रूर प्रकार करण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह गावातील बागेत पुरण्यात आला.

या प्रकरणात सुरुवातीला आरोपींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत बलात्कार झाल्याचा दावा केला होता. मात्र, शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले नाही. पोलिसांच्या मते, आरोपी भीम रामवर यापूर्वीही खूनाचे आरोप आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत झारखंड उच्च न्यायालयाने स्वतःहून हस्तक्षेप केला आहे. न्यायमूर्ती सुजीत नारायण प्रसाद आणि न्यायमूर्ती संजय प्रसाद यांच्या खंडपीठाने राज्य प्रशासन आणि पोलिस महासंचालकांना नोटीस बजावली आहे.

घटनेनंतर सुरुवातीला मुलीच्या आईने अपहरणाचा आरोप केला होता. 25 मार्च 2026 रोजी गावाजवळील शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेविरोधात राजकीय वातावरणही तापले असून भारतीय जनता पक्षाने हजारीबागमध्ये 12 तासांचा बंद पुकारून निषेध नोंदवला.  

हेही वाचा: LPG Gas Supply: युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG पुरवठ्यात अडथळे? केंद्र सरकारने फिरवली चक्रे; 'या' बंदरावरून आता देशभर होणार गॅस वितरण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number