उद्योगमंत्री उदय सामंतांनी घेतली शहीद मुरली नाईक कुटुंबियांची भेट

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या विनाकारण गोळीबारात 25 वर्षीय सैनिक एम. मुरली नाईक शहीद झाले. या पार्श्वभूमीवर, शनिवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाईक कुटुंबाची स्वतः भेट घेतली.

उद्योगमंत्री उदय सामंतांनी घेतली शहीद मुरली नाईक कुटुंबियांची भेट

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांपूर्वी भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या विनाकारण गोळीबारात गंभीर जखमी होऊन 25 वर्षीय सैनिक एम. मुरली नाईक शुक्रवारी सकाळी शहीद झाले.

या पार्श्वभूमीवर, शनिवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाईक कुटुंबाची स्वतः भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या दुःखाबद्दल सहानुभूती व्यक्त केली. दरम्यान, उदय सामंत यांनी शहीद मुरली नाईक यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांशी थेट संवाद साधला. यावेळी, मंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून संपूर्ण परिस्थितीबद्दल माहिती दिली. त्यानंतर, व्हिडिओ कॉलद्वारे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला. यादरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदेंनी शहीद मुरली नाईक यांचे वडील श्रीराम नाईक यांच्यासोबत संवाद साधत, 'शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल', असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले.

हेही वाचा: भारत-पाक युद्धाशी आमचा संबंध नाही; अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष जे.डी.व्हान्स यांचं वक्तव्य

उपमुख्यमंत्री शिंदेंची भावनिक प्रतिक्रिया:

शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. वीर सुपुत्राच्या बलिदानाचा आम्हाला अभिमान आहे, त्याची स्मृती जपली जाईल आणि त्यांच्या कुटुंबीयांना कधीच एकटे वाटू देणार नाही', अशी भावनिक प्रतिक्रिया शिंदेंनी दिली. या दरम्यान, नाईक कुटुंबीय भावनाविवश झाले होते.

हेही वाचा: वेरूळ घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुरक्षा वाढवली; सीसीटीव्ही मार्फत कडक तपासणी

मंत्री सामंतांचे महत्त्वपूर्ण निर्णय:

यावेळी, उद्योगमंत्री उदय सामंत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करत सांगितले की, 'शहीद मुरली नाईक यांच्या सन्मानार्थ मुंबईत त्यांचा पुतळा उभारला जाईल. त्यांच्या शौर्याची स्मृती कायम ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना त्यांचे बलिदान समजून घेण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे'.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number