Indonesia Earthquake: इंडोनेशियाला 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का; सुमात्रा बेटासह परिसर हादरला

अलिकडच्या काळात विविध देशांमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपांमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला असल्याने, या ताज्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.<br/>

Indonesia Earthquake: इंडोनेशियाला 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का; सुमात्रा बेटासह परिसर हादरला

Indonesia Earthquake: जगभरात भूकंपाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असतानाच आता इंडोनेशियातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मंगळवारी इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाजवळ शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. अलिकडच्या काळात विविध देशांमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपांमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला असल्याने, या ताज्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भूकंपाची नेमकी स्थिती काय?
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10:26 वाजता इंडोनेशियाला हा निसर्गाचा तडाखा बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 20 किलोमीटर खोलीवर होते. सुदैवाने, या भूकंपामुळे अद्याप कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही, मात्र प्रशासन सतर्क झाले आहे.

‘रिंग ऑफ फायर’ मुळे वाढला धोका
इंडोनेशियातील हा भूकंप सुमात्रा बेटाजवळील सागरी क्षेत्रात झाला. हा भाग पॅसिफिक महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ (Ring of Fire) वर स्थित आहे. या क्षेत्रात अनेक टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना जोडलेल्या असल्याने हा प्रदेश भूकंप आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. भौगोलिक रचनेमुळे इंडोनेशियात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात.

हेही वाचा – Iran-Israel war : इस्रायलकडून बेरूत, तेहरानवर एकाचवेळी हल्ल्याची घोषणा; हल्ल्यानंतर रियाधमधील अमेरिकन दूतावास तात्पुरता बंद

भूकंप नेमका का होतो?
पृथ्वीच्या अंतरंगात एकूण 7 मुख्य टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सातत्याने अतिशय संथ गतीने हलत असतात. मात्र, जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात किंवा त्यांच्यात घर्षण होते, तेव्हा प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. या ऊर्जेमुळेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर कंपनं निर्माण होतात, ज्याला आपण भूकंप म्हणतो. या लहरींची तीव्रता जितकी जास्त, तितका विनाशाचा धोका अधिक असतो.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number