पुण्यात दोघांना ईडीने घेतले ताब्यात

  पुण्यात ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाच्या छापेमारीमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. वक्फ जमिनीचे व्यवहार ईडीच्या रडारवर असून पुण्यातील दोघांना याप्रकरणी ईडीने ताब्यात घेतले आहे. भगवान कांबळे आणि सतीश निवृत्ती राजगुरू यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.  प्राथमिक माहितीनुसार, ईडीने वक्फ जमिनी लाटण्याच्या प्रकरणात तपास सुरू केला आहे. ईडीने व्यावसायिकांच्या सात वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाच वेळी धाड टाकली […]

पुण्यात दोघांना ईडीने घेतले ताब्यात

  पुण्यात ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाच्या छापेमारीमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. वक्फ जमिनीचे व्यवहार ईडीच्या रडारवर असून पुण्यातील दोघांना याप्रकरणी ईडीने ताब्यात घेतले आहे. भगवान कांबळे आणि सतीश निवृत्ती राजगुरू यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.

 प्राथमिक माहितीनुसार, ईडीने वक्फ जमिनी लाटण्याच्या प्रकरणात तपास सुरू केला आहे. ईडीने व्यावसायिकांच्या सात वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाच वेळी धाड टाकली आहे. मात्र आता वक्फ बोर्डाच्या जमीन प्रकरणातील तक्रारदार मुश्ताक अहमद शेख पुढे आला आहे. ३ नोव्हेंबर रोजी मुश्ताक अहमद शेख यांनी या जमिनीच्या प्रकरणाची तक्रार ईडीकडे केली होती. तसेच त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत ईडीने तत्परनतेने केलेल्या कारवाईमुळे मी समाधानी असल्याचे तक्रारदार मुश्ताक अहमद शेख यांनी सांगितले.

तक्रार काय आहे?

  मुश्ताक अहमद शेख यांनी सांगितले, वक्फ बोर्डाच्या मालकीची चार हेक्टर  जागा एका ट्रस्टची असल्याचे दाखवण्यात आले. या ट्रस्टकडून जागा शासनाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अधिग्रहित केली. अधिग्रहित केल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची झाली. असे त्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले, शासनाने या जमिनीसाठी नऊ कोटी साठ लाख रुपये ट्रस्टला दिले. तसेच वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला एन.ओ.सी देण्यात आली. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग असू शकतो. मात्र मी यामध्ये नवाब मलिकांचे नाव घेत नाही. हिंजवडी आयटी पार्कजवळ असलेली ही जागा चार हेक्टर इतकी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number