Pakistan Youtuber Threatens ICC : आगामी 2026 टी-20 विश्वचषकापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंधांतील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. पाकिस्तानी युट्यूबर आणि अभिनेता अर्सलान नसीर याने एका व्हिडिओद्वारे आयसीसी (ICC) आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे. “जर आयसीसीचे मुख्यालय भारतात असते, तर आमच्या लोकांनी त्यावर आणि आजूबाजूच्या परिसरावर बॉम्ब टाकला असता,” अशी उघड धमकी नसीरने दिली आहे. सध्या आयसीसीचे कार्यालय दुबईत असल्यानेच ते सुरक्षित असल्याचेही त्याने या व्हिडिओत म्हटले आहे.
जय शाह यांच्यावर साधला निशाणा
अरसलान नसीरने केवळ बॉम्ब टाकण्याची धमकीच दिली नाही, तर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यावरही वैयक्तिक टीका करत विष ओकले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी या प्रक्षोभक भाषेचा निषेध केला आहे. पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात खेळण्यास नकार दिल्यानंतर हे वादग्रस्त विधान समोर आले आहे.
?? Pakistani YouTuber Arslan Naseer wants to bomb ICC office "Our people would blast them if ICC office were relocated to ??India. Jay Shah & ICC are safe because the office is in ??Dubai.” What a pathetic mindset they have, it only exposes their real mentality pic.twitter.com/lyYEs7qYxG — Ajay Kashyap (@EverythingAjay) February 3, 2026
विश्वचषकावर अनिश्चिततेचे सावट
टी-20 विश्वचषक 7 फेब्रुवारी (शनिवार) पासून सुरू होत आहे, ज्याचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने आयसीसीसमोर मोठे पेचप्रसंग उभे राहिले आहेत. दुसरीकडे, बांगलादेशनेही त्यांचे सामने इतर देशात हलवण्याची विनंती नाकारल्यानंतर स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घडामोडींमुळे विश्वचषकाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.