Gopichand Padalkar: सोलापुरात मराठा आंदोलकांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा ताफा अडवला; जोरदार घोषणाबाजी

सोलापुरात आलेल्या आमदार पडळकरांचा ताफा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अचानक अडवला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

Gopichand Padalkar: सोलापुरात मराठा आंदोलकांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा ताफा अडवला; जोरदार घोषणाबाजी

Gopichand Padalkar faces Maratha Protest in Solapur: मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी मराठा आंदोलक मोर्चे काढत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वातावरण तापलेले असताना, सोलापूर दौऱ्यावर आलेल्या भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मराठा आंदोलकांच्या तीव्र आक्रोशाला सामोरे जावे लागले.

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा
सोलापुरात आलेल्या आमदार पडळकरांचा ताफा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अचानक अडवला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत लोकप्रतिनिधींना धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे, ज्याची प्रचीती या घटनेतून पुन्हा एकदा आली. आंदोलकांनी आमदार पडळकर यांच्याकडे मराठा आरक्षणाबाबत तसेच मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी केली.

हेही वाचा – Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस, पुन्हा उपचार घेणं सोडलं; सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

सरकारची आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत प्रश्न 
ताफा अडवल्यानंतर मराठा आंदोलकांनी गोपीचंद पडळकर यांच्या वाहनाला वेढा घालत, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आणि 'SEBC' तसेच कुणबी नोंदींच्या अंमलबजावणीबाबत सरकारची आणि लोकप्रतिनिधींची भूमिका काय आहे, असा थेट जाब विचारला. आंदोलकांनी घोषणाबाजी करत पडळकरांना गाडीतून बाहेर येऊन भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. काही काळ रस्त्यावर मोठा गदारोळ निर्माण झाला होता, ज्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आणि वातावरण तणावपूर्ण बनले.

लोकप्रतिनिधींनी आश्वासनांपेक्षा ठोस कृती करण्याची मागणी
घटनेचे गांभीर्य ओळखून पडळकरांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. 'मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे,' असे सांगत त्यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता ठोस कृती करावी, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी लावून धरली. अखेर स्थानिक पोलीस यंत्रणेने मध्यस्थी करत सुरक्षेच्या कारणास्तव परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आमदार पडळकरांच्या ताफ्याला पुढील प्रवासासाठी रस्ता करून दिला.

हेही वाचा – MNS's Gen-Z Dahi Handi : आधी होकार, आता नकार! दहीहंडीच्या एक दिवस आधी पोलिसांनी अचानक नाकारली परवानगी; मनसे जेन-झी हंडी फुटणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number