Gold Rate News : काय सांगता? सोन्याचे दर 4 हजारांनी घसरले; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना सोने खरेदीची सुवर्णसंधी

जळगावच्या सराफ बाजारातून मराठी नववर्षाच्या पूर्वार्धाथीच ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे.

Gold Rate News : काय सांगता? सोन्याचे दर 4 हजारांनी घसरले; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना सोने खरेदीची सुवर्णसंधी

आखाती देशात सुरू असलेले युद्ध, जागतिक बाजारातील अनिश्चितता तसेच गुंतवणूकदारांकडून होत असलेले प्रॉफिट बुकिंग यामुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अशातच जळगावच्या सराफ बाजारातून मराठी नववर्षाच्या पूर्वार्धाथीच ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी काळात लग्नसराईचा हंगाम जोमाने सुरू असतानाच सोन्याच्या दरांनी विक्रमी पातळी गाठली होती. मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गुढी पाडव्याआधीच गुड न्यूज समोर आल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा- Gold Silver Rate Today: सोन्याच्या किमतीत घट; चांदीचे दरही 4000 रुपयांनी घसरले, पाहा आजचे दर
गेल्या पाच दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात 17 हजार 500 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. याशिवाय केवळ एका दिवसातच सोन्याचा दर 1 हजार 500 रुपयांनी, तर चांदीचा दर 4 हजार रुपयांनी कमी झाल्याचे जळगाव सराफ बाजारातून समोर आले आहे. या घसरणीमुळे सराफा दुकानांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारातील अस्थिरता पाहता गुंतवणूकदारांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पाऊल उचलणे फायद्याचे ठरेल.

हेही वाचा- Central Railway Recruitment: परीक्षा नाही, मुलाखतही नाही! रेल्वेमध्ये थेट नोकरीची संधी; त्वरित असा करा अर्ज
सतत घसरत असलेल्या या दरांमुळे एकीकडे सराफ व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असली, तरी दुसरीकडे गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. सध्या जळगाव सराफ बाजारात जीएसटीसह सोन्याचा दर 1 लाख 64 हजार रुपये, तर चांदीचा दर 2 लाख 68 हजार रुपये इतका आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा असल्यामुळे दर घसरल्याने बाजारात खरेदी वाढण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान दर घसरल्यामुळे आगामी काळात येऊ घातलेल्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांसाठी उत्तम संधी मिळाली आहेच. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number