Bhigwan Girl Kidnapped : एकीकडे हिंदू संघटना आक्रमक, दुसरीकडे अपहरणकर्त्या मुलीचा संभ्रमात टाकणारा व्हिडीओ समोर; भिगवणमधील वातावरण चिघळलं

भिगवण : पुणे जिल्ह्यातील भिगवणमध्ये 21 वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या भिगवण बाजारपेठेतून एका तरुणीचं अपहरण करण्यात आलं होतं. बाजारपेठेत आई आणि भावासोबत आलेल्या या तरुणीचं दोन मुस्लीम तरुणांची अपहरण केल्याची बातमी समोर आली होती. यावेळी तिच्या आई व भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत जनआक्रोश […]

Bhigwan Girl Kidnapped : एकीकडे हिंदू संघटना आक्रमक, दुसरीकडे अपहरणकर्त्या मुलीचा संभ्रमात टाकणारा व्हिडीओ समोर; भिगवणमधील वातावरण चिघळलं

भिगवण : पुणे जिल्ह्यातील भिगवणमध्ये 21 वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या भिगवण बाजारपेठेतून एका तरुणीचं अपहरण करण्यात आलं होतं. बाजारपेठेत आई आणि भावासोबत आलेल्या या तरुणीचं दोन मुस्लीम तरुणांची अपहरण केल्याची बातमी समोर आली होती. यावेळी तिच्या आई व भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत जनआक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. तसेच भिगवण बंदची हाकही देण्यात आली होती. दरम्यान, अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट आला आहे. अपहरण झालेल्या मुलीसोबत आरोपी बसलेला दिसत आहे. यामध्ये ती म्हणाली की, वर्षभरापासून आमचं प्रेमप्रकरण सुरू आहे. माझं अपहरण झालेलं नाही. किंवा माझ्यासोबत कोणतीही जबरदस्ती करण्यात आलेली नाही. मी माझ्या मर्जीने त्यांच्यासोबत गेल्याचं मुलीने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ती पुढे म्हणाली, माझ्यावर मिरचीची पूडही टाकण्यात आली नाही. मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आल्याचं मुलीने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. यामुळे हे प्रकरण आणखीनचं चिघळलं आहे. तर दुसरीकडे हिंदू जन आक्रोश संघटनेने मोर्चा काढला असून त्या मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय त्या मुलीवरून बळजबरीने हा व्हिडिओ बनवून घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : Dhule : भयंकर! स्मशानातील सोनं चोरीला, अंत्यविधीनंतरची राखही राहिली नाही शिल्लक; धुळ्यात चाललंय काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number